मुंबई, दि. १८ : राज्यातील दुष्काळाची दखल चीन सरकारकडून घेण्यात आली आहे. चीनचे कॉन्सूल जनरल झेंग झियॉन यांनी सोलापूर शहरातील पाणी टंचाईचा मुकाबला करण्यासाठी महापालिकेला ३० लाख रूपयांची मदत दिली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. सोलापूरमधील डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्याशी असलेल्या चीनच्या ऋणानुबंधातून ही मदत देण्यात आली आहे.
सोलापूरसह राज्यामध्ये यंदा पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. या परिस्थितीमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेऊन चिनी दुतावासाने याबाबतची माहिती चीन सरकारला कळविली होती. डॉ. कोटणीसांनी चीनसाठी केलेल्या त्यागाची आठवण ठेवत त्यांच्या सोलापूर या मूळ गावासाठी मदत करण्याचा निर्णय चीन सरकारने घेतला. त्यानुसार सोलापूर शहरात हातपंपासह ५० कूपनलिका खोदण्यासाठी महानगरपालिकेला ३० लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला.
दुसऱ्या महायुद्धात चीनवर झालेल्या आक्रमणावेळी मूळचे सोलापूरचे असललेल्या डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांनी चीनमध्ये जाऊन वैद्यकीय सेवा दिली होती. आपल्या प्रकृतीची काळजी न करता डॉ. कोटणीस यांनी तेथील जखमींवर उपचार केले होते. त्यामुळे सोलापूरबाबत चीनच्या मनात एक हळवा कोपरा आहे. त्यामुळेच सोलापूला दुष्काळ निवारणासाठी मदत करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment