यांत्रिक झाडू यंत्रणा पुन्हा बाहेर काढण्याची महानगरपालिकेची तयारी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

यांत्रिक झाडू यंत्रणा पुन्हा बाहेर काढण्याची महानगरपालिकेची तयारी

Share This
मुंबई - अडगळीत ठेवलेली यांत्रिक झाडू यंत्रणा पुन्हा बाहेर काढण्याची तयारी मुंबई महानगरपालिकेने केली आहे. शहरातील मुख्य रस्ते यांत्रिक झाडूने स्वच्छ करण्याचा प्रशासनाचा विचार आहे. त्यासाठी अहवाल तयार करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. 

मुंबई महापालिकेने काही वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून यांत्रिक झाडू खरेदी केले होते. त्यांचा उपयोग रुग्णालयात करण्याचा प्रशासनाचा विचार होता. सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात प्रायोगिक तत्त्वावर त्यांचा वापरही करण्यात आला होता; मात्र कामगार संघटनांनी विरोध केल्याने ते धूळ खात पडून होते. काही महिन्यांपूर्वी सर्वपक्षीय गटनेत्यांनी ते पुन्हा वापरण्याची मागणी आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे केली होती. त्यानुसार आयुक्तांनी त्यांच्या वापराबाबत अभ्यास करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. 


सध्या पूर्व आणि पश्‍चिम द्रुतगती मार्गाची साफसफाई काही प्रमाणात यांत्रिक झाडूंनी केली जाते; तसेच वांद्रे-कुर्ला संकुलातील रस्त्याच्या साफसफाईसाठीही यांत्रिक झाडूचा काही प्रमाणात वापर केला जातो; मात्र यांत्रिक झाडूंचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्याचा महापालिकेचा विचार आहे. निदान शहरातील सर्व मुख्य रस्त्यांची सफाई या झाडूंनी करण्याचे पालिकेच्या विचाराधीन आहे. दिवसाला 1,800 किलोमीटरहून अधिक लांबीचे रस्ते रोजच्या रोज साफ केले जातात. त्यासाठी महापालिकेचे 28,018 आणि कंत्राटी 1,886 कामगार राबतात. यांत्रिक झाडूमुळे अनेक कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळू शकते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages