महापालिकेच्या चेंबूर येथील मा रुग्णालयात कर्मचाऱ्यांचा धिंगाणा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महापालिकेच्या चेंबूर येथील मा रुग्णालयात कर्मचाऱ्यांचा धिंगाणा

Share This
हळदीकुंकू आणि नाचगाण्यासाठी बाहय रुग्ण विभाग ठेवला बंद 
मुंबई / अजेयकुमार जाधव 
मुंबई महानगरपालिकेच्या चेंबूर येथील मा रुग्णालयातील डॉक्टर आणि महिला कर्मचाऱ्यांनी शासकीय कामकाजाच्या वेळात हळदीकुंकू समारंभात गाण्यांवर धिंगाणा घातल्याचे एका व्हिडीओमधून उघड झाले आहे. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी गाण्यांवर धिंगाणा घालण्यासाठी संपूर्ण एक दिवस रुग्णालयाचा बाह्य रुग्ण विभाग बंद ठेवून रुग्णांची गैरसोय केल्याने या प्रकरणाची गंभीर दखल घेत दोषी डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी चेंबूर वासियांकडून केली जात आहे. 
  
मिळालेल्या माहितीनुसार मुंबई महापालिकेच्या चेंबूर येथील मा रुग्णालयात २ फेब्रुवारी २०१६ रोजी मेट्रन रतन खर्जे - व्हनमाने, सिस्टर इनचार्ज श्यामल नागवेकर, प्रिया गुप्ते, मंजू मथारु यांनी रुग्णालयात महिलांसाठी भव्य दिव्य हळदीकुंकू समारंभ आयोजित केला हाेता. सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजे पर्यंत चालणाऱ्या हळदीकुंकू समारंभासाठी मेट्रन व सिस्टर इनचार्ज यांनी पहिल्या मजल्यावरील संपूर्ण बाहय रुग्ण विभाग सकाळ पासुनच बंद ठेवण्यात आला होता. उपचारासाठी आलेल्या रुग्णांना काेणीही डॉक्टर्स आलेले नाहीत " असे खाेटे कारण सांगून पुढील उपचारांसाठी खासगी दवाखान्यात पाठवण्यात आले होते. दिवसभर कोणतेही कामकाज न करता सकाळी दहा वाजल्यापासुन सायंकाळी सहा वाजेपर्यंत हळदीकुंकू साेहळ्याचे निमित्त पुढे करुन "पिंगा ग पाेरी पिंगा, शांताबाई, रिक्शा वाला, रेशमाच्या रेघांनी आदी अनेक गाण्यावर नाचून धिंगाणा घातल्याची माहिती चेंबूर वासियांनी दिली आहे.  

रुग्णालयांचा परिसर हा शांतता क्षेत्र म्हणून घोषित असताना आणि शासकीय कार्यालयाच्या ठिकाणी कोणतेही धार्मिक पूजा, हळदीकुंकू असे कार्यक्रम करण्यावर बंदी असताना कायदे धाब्यावर बसवत गाण्यांवर नाचून धिंगाणा घालण्यात आला आहे. या दिवशी संबंधित महिला कर्मचाऱ्यांनी दिवसभर कोणतेही शासकीय काम केलेले नाही. यामुळे यादिवशी रुग्णांची गैरसोय करण्यात आली आहे. कोणतीही परवानगी न घेता हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित करून गाण्यांवर धिंगाणा घातला जात असताना रुगणालय प्रशासन आणि अधिष्ठाता यांनी मात्र बघ्याची भूमिका घेतली होती. याप्रकरणी आता पालिका आयुक्त अजोय मेहता कोणती कारवाई करतात याकडे चेंबूरवासियांचे लक्ष लागले आहे. दरम्यान याबाबत रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकलेला नाही.

म्हणून व्हिडीओ झाला लिक 
कार्यक्रमाचे आयोजन करताना आपण कुठे पकडले जाऊ नए म्हणून रुग्णालयाच्या बाजूने पडदे लावून रुग्णालयाचा बाह्य विभाग झाकून घेण्यात आला होता. महिला कर्मचारी, अधिकारी आणि डॉक्टर हळदीकुंकू समारंभात गाण्यांवर धिंगाणा घालणार असल्याने फक्त महिला कर्मचाऱ्यांना कार्यक्रमाची शुटींग करण्यास परवानगी देण्यात आली होती. परंतू रुग्णालय प्रशासन, डॉक्टर आणि अधिष्टाता यांचा मनमानी कारभार सुरु आहे. या कारभाराला बहुतेक रुग्ण आणि रुग्णांचे नातेवाईक वैतागले आहेत. रुगणालय प्रशासनाला धडा शिकवण्यासाठी तब्बल ३ महिन्यांनी व्हिडीओ लिक करण्यात आला आहे.

महापुरुषांच्या जयंतीला मात्र बंदी 
हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित करून गाण्यांवर धिंगाणा घातला जाणाऱ्या महापालिकेच्या मा रुग्णालयात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या जयंती करण्यास, फोटोना हार घालण्यास प्रशासनाची बंदी असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. हळदीकुंकूच्या नावाने धिंगाणा घालणाऱ्या कर्मचारी अधिकारी डॉक्टरांना शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची इतकी एलर्जी का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

(मुंबई महापालिकेच्या मा रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचा धिंगाणा पाहण्यासाठी https://youtu.be/3hRo6e-DF3s / http://jpnnewstv.blogspot.in/2016/05/blog-post.html या लिंकला भेट द्या) 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages