मुंबई / प्रतिनिधी - समुद्री सुरक्षा तसेच शोध व बचाव कार्य यामध्ये सातत्य व सुधारणा राखण्याच्या दृष्टीने भारतीय तटरक्षक दलाच्या वतीने आज (दिनांक ०३ मे, २०१६) मुंबई नजीकच्या समुद्रात करण्यात आलेल्या कवायतीमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेने देखील सहभाग घेतला.
राष्ट्रीय सामुद्रीक शोध आणि बचाव कवायत - २०१६ (National Maritime SAR exercise “SAREX-16”) अंतर्गत आज तटरक्षक दलाने मुंबई नजीकच्या समुद्रात ही कवायत आयोजित केली. यामध्ये सुमारे १९६ प्रवाशांना घेऊन मुंबई विमानतळावरुन उड्डाण करुन सिंगापूरकडे निघालेले विमान बेपत्ता होते व काही वेळाने हे विमान समुद्रात कोसळून शोध व बचाव कार्य हाती घेणे, अशी रंगीत तालीम स्थिती निर्माण करण्यात आली. त्यानंतर तटरक्षक दलाच्या नौका, नौदलाच्या नौका, विमाने, हेलिकॉप्टर यांनी शोध व बचाव कार्य कवायतीला सुरुवात केली.
समुद्रातून शोध आणि बचाव कार्यामध्ये रंगीत तालमीचा एक भाग म्हणून अपघातग्रस्त व्यक्तिंना मुंबईत ससून डॉक, मुंबई पोर्ट ट्रस्टचा धक्का, गिरगांव चौपाटी तसेच महालक्ष्मी रेसकोर्स येथे आणण्यात आले. या ठिकाणाहून अपघातग्रस्तांना रुग्णालयात नेण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आरोग्य प्रशासन, खासगी रुग्णालये, आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा, मुंबई पोलिस, वाहतूक पोलिस यांच्या समन्वयाने रंगीत तालीम करण्यात आली. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे वैद्यकीय पथक, रुग्णवाहिका यांची मदत त्याकरीता घेण्यात आली.
प्रत्यक्ष अशा घटना उद्भवल्यास सर्व संबंधित यंत्रणांना करावे लागणारे कार्य, संभाव्य अडचणी, त्यावर करावयाच्या उपाययोजना यांचा अभ्यास व्हावा आणि समन्वयातून आपत्कालीन बचाव कार्य सक्षम व्हावीत, या हेतूने ही कवायत आयोजित करण्यात आली होती.

No comments:
Post a Comment