मुंबई, दि. ७ : नागरी व ग्रामीण क्षेत्रातील पाणीटंचाई निवारणासाठी राज्याच्या विविध भागात तातडीच्या पाणीपुरवठा योजनांना मान्यता देण्यात आल्याची माहिती पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली. साधारण ३ कोटी ७६ लाख रुपयांच्या तात्पुरत्या नळ पाणीपुरवठा योजनांना प्रशासकीय मंजुरी दिल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील दुष्काळाची परिस्थिती पाहता टंचाई निवारणासाठी राज्य शासनामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. यासाठी आवश्यकतेनुसार शहरे आणि गावांना तातडीच्या पाणीपुरवठा योजनांना मान्यता देण्यात येत आहे. त्यानुसार तात्पुरत्या पुरक नळ पाणीपुरवठा योजनेकरिता धुळे जिल्ह्यातील मौजे नरडाणा (ता. शिंदखेडा) येथे 48.47 लाख रुपयांच्या योजनेस मंजुरी देण्यात आली. माळाकोळी व 10 तांडे (जिल्हा नांदेड) येथे तात्पुरत्या पुरक नळ पाणीपुरवठा योजनेकरिता 2 कोटी 30 लाख रुपये,मौजे हतनूर (ता. कन्नड, जिल्हा औरंगाबाद) येथील तात्पुरत्या पुरक नळ पाणीपुरवठा योजनेसाठी 26.91 लाख रुपये, मौजे वाकी बुद्रुक व मौजे वाकी खुर्द (ता. जामनेर, जिल्हा जळगाव) येथील तात्पुरत्या पुरक नळ पाणीपुरवठा योजनेसाठी 24.97 लाख रुपये, मौजे विहामांडवा (ता. पैठण, जि. औरंगाबाद) येथे तात्पुरत्या पुरक नळ पाणीपुरवठा योजनेकरिता 25.96 लाख रुपयांच्या तर मौजे रावेर ग्रामिण (ता. रावेर, जिल्हा जळगांव) करिता 19.47 लाख रुपये किमतीच्या तात्पुरत्या पुरक नळ पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मंजुरी देण्यात आल्याची माहिती श्री. लोणीकर यांनी दिली.

No comments:
Post a Comment