पाण्याचा वेगाने निचरा करण्यासाठी पंप सुरू न झाल्यास कंत्राटदाराला दंड - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पाण्याचा वेगाने निचरा करण्यासाठी पंप सुरू न झाल्यास कंत्राटदाराला दंड

Share This
मुंबई - पावसाळ्यात रस्त्यावर साचणाऱ्या पाण्याचा वेगाने निचरा करण्यासाठी 271 पंप बसवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. कामाच्या वेळी हे पंप सुरू न झाल्यास कंत्राटदाराकडून 50 हजारांपर्यंत दंड वसूल केला जाणार आहे. 


पावसाळ्यात रस्त्यावर साचणाऱ्या पाण्याचा वेगाने निचरा करण्यासाठी महापालिकेने काही वर्षांपासून पंप बसवण्यास सुरुवात केली आहे. हे पंप बसवण्यासाठी महापालिका कंत्राटदार नेमते. महापालिकेने गेल्या वर्षी 244 पंप बसवले होते. यंदा 271 पंप बसवले जाणार आहेत. गरजेच्या वेळी पंप सुरू न झाल्यास समस्या निर्माण होऊ नये म्हणून प्रत्येक प्रभागात दोन पंप राखीव ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. गेल्या वर्षी 18 ठिकाणी पंप सुरू झाले नव्हते. त्याचा फटका नागरिकांना बसला होता. साचलेल्या पाण्याचा वेगाने निचरा न झाल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला होता.
यावर उपाय म्हणून पंप सुरू न झाल्यास कंत्राटदारांकडून दंड वसूल करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. पंपाच्या क्षमतेनुसार 10 हजार ते 50 हजारांपर्यंत दंड आकारला जाईल. मुंबईतील सखल भागात किरकोळ पावसातही पाणी साचते. हिंदमाता, किंग्ज सर्कल, शीव रस्ता क्रमांक 24, अंधेरी सबवे, मालाड सबवे अशा ठिकाणी पावसाचे पाणी साचून वाहतुकीची कोंडी होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages