मुंबई - मुंबईतील अनेक भागांमध्ये दाटीवाटीने वसलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये आगीसारख्या दुर्घटना घडल्यास त्यावर त्वरित उपाय म्हणून पाण्याचे हायड्रंट (नळखांब) बसवण्याची मागणीच महापालिकेने फेटाळून लावली आहे. झोपडपट्ट्यांमध्ये हायड्रंटमधून पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होणार नाही. शिवाय यामधून पाण्याचा गैरवापर होण्याची भीती व्यक्त करत प्रशासनाने याची गरजच नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे हायड्रंटचा मुद्दा स्थायी समितीत निकाली निघण्याची शक्यता आहे.
झोपडपट्ट्यांमध्ये जागा उपलब्ध नसणे, वेडेवाकडे व अरुंद रस्त्यांमुळे नवीन जलवाहिनी टाकताना अडचणी येतात. त्यामुळे अशा ठिकाणी उभे हायड्रंट बसवणे अशक्य आहे. तसेच मुंबईला होणारा कालबद्ध पाणीपुरवठा आणि पाण्याचा दाब लक्षात घेता आगीच्या ठिकाणी पाणीपुरवठा वळविणे शक्य होत नाही. पाणीपुरवठा वळविला तरी आगीच्या बंबामध्ये पाणी भरण्यासाठी पुरेशा दाबाअभावी हायड्रंटचा उपयोग होत नाही, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे हायड्रंट झोपडपट्ट्यांमध्ये लावता येणार नाही, हायड्रंटचा उपयोग पाण्याच्या गैरवापरासाठीसुद्धा होण्याची शक्यता जास्त असते, असे जलअभियंता विभागाने स्पष्ट केले आहे. कांदिवलीतील दामूनगर झोपडपट्टीत आगीची दुर्घटना घडून शेकडो झोपड्या खाक झाल्यानंतर कॉंग्रेसचे नगरसेवक राम आशीष गुप्ता यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे झोपडपट्ट्यांमध्ये आग विझवण्याचे हायड्रंट (पाण्याचे उभे नळखांब) प्राधान्याने बसवण्यात यावेत, अशी मागणी केली होती.

No comments:
Post a Comment