पोलीस कोठडीत तब्बल २६८ जणांचा अंत - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पोलीस कोठडीत तब्बल २६८ जणांचा अंत

Share This
मुंबई - पोलीस कोठडीत गेल्या सव्वा आठ वर्षांत राज्यातील विविध पोलीस ठाण्यात अथवा कोठडीत असलेल्या तब्बल २६८ जणांचा अंत झाला आहे. या वर्षात मार्च अखेरपर्यत ६ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. घरफोडीच्या गुन्ह्यात मुलुंड पोलीस ठाण्यात अटकेत असलेल्या अमित राठोड या आरोपीने रविवारी मध्यरात्री शौचालयात स्वत:च्या शर्टने गळफास लावून घेतला. त्यापार्श्वभूमीवर आत्तापर्यंत राज्यभरात पोलीस कोठडीत झालेल्या मृत्यूबाबतचा आढावा घेतला असता धक्कादायक आकडेवारी समोर आली. २००८ पासून ते मार्च २०१६ पर्यंत म्हणजे सव्वा आठ वर्षांच्या कालावधीत पोलीस कोठडीत एकूण २६८ जणांचा मृत्यू झाला आहे. २०१४ मध्ये ४३ तर २०१५ या वर्षांत ३८ तर या वर्षाच्या मार्च अखेरपर्यत ६ जणांचा अंत झाला आहे.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages