मुंबई, दि. 2 मे, 2016: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकूण निधीपैकी ३ टक्के निधी अपंग व्यक्तींचे कल्याण आणि पुनर्वसनाकरिता राखून ठेवण्याचा शासनाचा निर्णय आहे. या योजनेतून देण्यात येणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठीचा निधी आता थेट अपंग लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.
मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, २००१ च्या अपंग कल्याणकृती आराखड्यातील सुचनेनुसार ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (जिल्हा परिषदा, पंचायत समित्या व ग्रामपंचायती) स्वउत्पन्नातील एकूण निधीपैकी ३ टक्के निधी हा अपंग व्यक्तींच्या कल्याण आणि पुनर्वसनासाठी राखून ठेवून खर्च करावा लागतो. या निधीतून अपंगांना विविध प्रकारचे सामूहिक तसेच वैयक्तिक लाभ देण्यात येतात.यातील वैयक्तिक लाभातील वस्तुंच्या खरेदीसाठीचा निधी हा आता थेट अपंग लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेतून अपंग व्यक्तींना सहाय्यभूत साधने व तंत्रज्ञानाच्या खरेदीकरिता थेट त्यांच्या बँक खात्यात निधी उपलब्ध करुन दिला जाईल.
या निधीतून अपंगांना पुढील प्रमाणे साहीत्य खरेदी करता येईल.
1) अंध व्यक्तींसाठी : मोबाईल फोन, लॅपटॉप / संगणक (जॉस सॉफ्टवेअर), बेल नोट वेअर, Communication equipment Braille attachement telephone, adapeted walkers, ब्रेल लेखन साहित्य, ब्रेल टाईपरायटर, टॉकिंग टाईपरायटर, लार्ज प्रिंट बुक, अल्पदृष्टी अपंगत्वावर मात करण्यासाठी digital magnifiersइत्यादी सहाय्यभूत साधने व उपकरणांकरिता अर्थसहाय्य करणे.
2) कर्णबधीर व्यक्तींसाठी: विविध प्रकारची वैयक्तिक श्रवणयंत्रे (बीटीईसह) शैक्षणिक संच, संवेदन उपकरणे, संगणकासाठीचे सहाय्यभूत उपकरणे.
3) अस्थिव्यंग व्यक्तींसाठी : कॅलीपर्स, व्हीलचेअर, तीनचाकी सायकल, स्वयंचलित तीन चाकी सायकल, कुबड्या, कृत्रीम अवयव, प्रोस्थोटिक ॲण्ड डिव्हायसेस, वॉकर, सर्जिकल फुटवेअर, स्प्लींटस, मोबालिटी एड्स, कमोड चेअर्स, कमोड स्टुल, स्पायनल ॲण्ड नील वॉकी ब्रेस, डिव्हायसेस फॉर डेली लिव्हींग इत्यादी.
4) मतिमंद व्यक्तींसाठी : मतिमंदासाठी शैक्षणिक साहित्य संच (MR kits), बुध्दीमत्ता चाचणी संच, सहाय्यभूत उपकरणे व साधने तसेच तज्ज्ञाने शिफारस केलेली अन्य सहाय्यभूत साधने.
5) बहुविकलांग व्यक्तीसाठी : संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञाने शिफारस केलेली सुयोग्य सहाय्यभूत साधने व उपकरणे, सी.पी. चेअर, स्वयंचलित सायकल व खुर्ची, संगणक वापरण्यासाठीची सहाय्यभूत उपकरणे.
6) कुष्ठरोगमुक्त अपंग व्यक्ती : कुष्ठरोगमुक्त अपंगांसाठी कृत्रिम अवयव व साधने, सर्जीकल ॲण्ड करेक्टीव्ह फूटवेअर्स, सर्जीकल अप्लांसेंस, मोबिलिटी एड इत्यादी.
7) याशिवाय अपंग व्यक्तिंना स्वयंरोजगारासाठी व्हेंन्डिंग स्टॉल, पीठ गिरणी, शिलाई मशिन, मिर्ची कांडप मशीन, फूड प्रोसेसिंग युनिट, झेरॉक्स मशीन आदी वस्तुंच्या खरेदीसाठीही स्थानिक स्वराज्य संस्था त्यांच्या ३ टक्के स्वनिधीतून अपंग लाभार्थ्याला त्याच्या बँक खात्यात थेट निधी वर्ग करुन लाभ देऊ शकतील.

No comments:
Post a Comment