मुंबई, दि. ९ : ठाणे आणि मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन उभारण्यासंदर्भातील कार्यवाहीस वेग द्यावा, असे निर्देश सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी आज दिले.
ठाणे आणि मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीतील सांस्कृतिक भवनासंदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीत श्री. बडोले बोलत होते. बैठकीस आमदार प्रताप सरनाईक,तहसिलदार विकास पाटील, सहायक आयुक्त श्रीमती सकपाळ, कक्ष अधिकारी चंद्रकांत वडे, विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
बडोले म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीचे औचित्य साधून बहुउद्देशिय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्र उभारण्याच्या कार्यास गती द्यावी. तसेच स्थानिकांच्या मागणीचा अभ्यास करून या बहुउद्देशिय केंद्रासंदर्भातील कार्यवाही गतीने करावी, असेही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले.

No comments:
Post a Comment