मुंबई, दि. 9 : महिला लोकशाही दिनात सुनावणी अर्जांवर तात्काळ कार्यवाही करुन तातडीने निकाली काढावेत,असे निर्देश महिला व बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर यांनी दिले. ठाकूर यांच्या दालनात महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे सदस्य सचिव अ. ना. त्रिपाठी, विशेष पोलीस महानिरीक्षक अर्चना त्यागी, महिला व बालविकास विभागाचे उपसचिव म. वा. हजारी, अवर सचिव सो. शि. मत्रे व संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी एकूण बारा तक्रारदार महिलांच्या अर्जांवर सुनावणी झाली.

No comments:
Post a Comment