इंदु मिलच्या जमिनीचे पुढील आठवड्यात हस्तांतरण होणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

इंदु मिलच्या जमिनीचे पुढील आठवड्यात हस्तांतरण होणार

Share This
मुंबई / प्रतिनिधी - महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदु मिलची संपूर्ण जमीन महाराष्ट्र सरकारकडे पुढील आठवड्यात हस्तांतरित होईल. त्यासाठी इंदु मिलच्या जमिनीची किंमत म्हणून महाराष्ट्र सरकार वस्त्रोद्योग मंडळाला 1450 कोटी रुपये देणार आहे. तसा प्रस्ताव केंद्रिय मंत्रीमंडळाच्या बैठकीत याच आठवड्यात मंजूर केला जाणार आहे असे आश्वासन केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) संतोष गंगवार यांनी  रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांना दिले.
मुंबईत चैत्यभूमी जवळ इंदुमिल च्या जमिनीवर महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होऊन महीने झाले. तरीही अद्याप स्मारकाचे प्रत्यक्ष काम सुरु झालेले नाही ते त्वरित सुरु व्हावे त्यासाठी इंदु मिलच्या जमिनीचे राज्यसरकारकडे त्वरित हस्तांतरण करावे. या मागणीसाठी आठवले यांनी  केंद्रीय मंत्री संतोष गंगवार यांची वस्त्रोद्योग मंत्रालयात भेट घेतली. यावेळी उभयतांमध्ये दीर्घ चर्चा झाली यावेळी रिपाइंचे राष्ट्रिय सरचिटणीस अविनाश महातेकर उपस्थित होते

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages