स्थायी समितीच्या बैठकीतून पाणीकपात मागे घेण्याची मागणी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

स्थायी समितीच्या बैठकीतून पाणीकपात मागे घेण्याची मागणी

Share This
मुंबई दि. 13 July 2016 - मुंबई मध्ये गेल्या वर्षी कमी पाऊस पडल्याने २० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली होती. यावर्षी जून मध्ये पाऊस कमी पडला असताना जुलै महिन्यात मात्र पावसाने जोर धरला आहे. यामुळे तलावांतील पाण्याची पातळी दररोज वाढत आहे़. गतवर्षीच्या तुलनेत तलावांमध्ये दुप्पट जलसाठा असल्याने पाणी कपात रद्द करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. 

जूनच्या शेवटी मुंबई मध्ये पावसाची सुरुवात झाली आहे. सुरुवातिला कमी असलेलया जुलै महिन्यातील पंधरवडा पूर्ण होण्या आधीच तलावांमध्ये तब्बल पाच लाख दशलक्ष लीटरहून अधिक जलसाठा तलावांमध्ये जमा झाला आहे़ तलाव क्षेत्रात जोरदार पाऊस होत असल्याने काही तलावं लवकरच भरुन वाहण्याची चिन्हे आहेत़. त्यामुळे भाजपाचे दिलीप पटेल यांनी स्थायी समितीच्या बैठकीतून पाणीकपात मागे घेण्याची मागणी केली़ त्यानुसार तलावांमधील पाण्याच्या पातळीचा आढावा घेऊन स्थायी समितीच्या पुढच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन अतिरिक्त आयुक्त डॉ़ संजय मुखर्जी यांनी दिले.
तलावांमधील पाणीसाठा 
तलाव -           आजची स्थिती   आजचा पाऊस (मि़मी़)
मोडक सागर       १५४़९९             ७२़६०
तानसा              १२४़८५            २३़८०
विहार                 ७७़२५            २७़२०
तुळशी               १३८़८९            १४़००
अप्पर वैतरणा      ५९८़१८             १०८
भातसा              १२५़२७            २३
मध्य वैतरणा      २६४़७०           ७४़९०
एकूण          २०१६ -६३९६९८   दशलक्ष लीटर 
२०१५- २९०३९६ दशलक्ष लीटर

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages