‘एच/पूर्व’ विभागात दिनांक १२ जुलै, २०१६ पासून जलवितरण वेळेत बदल - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

‘एच/पूर्व’ विभागात दिनांक १२ जुलै, २०१६ पासून जलवितरण वेळेत बदल

Share This
मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पश्चिम उपनगरातील एच/पूर्व विभागात जलवितरण व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यासाठी पाणीपुरवठय़ाच्या वेळेत दिनांक १२ जुलै, २०१६ पासून बदल करण्यात येत आहे. एच/पूर्व विभागातील सेवानगर, जाकू क्लब, प्रभात वसाहत, टी. पी. एस. ३ व टी. पी. एस. ५, हनुमान टेकडी द्वार क्रमांक १ ते ५, मीलन सब  वे ते खार सब-वे, पश्चिम द्रुतगती महामार्गाची पश्चिम बाजू ते सांताक्रुझ (पूर्व) रेल्वे मार्गापर्यंत पहाटे ४.४५ ते सकाळी ७.०० या वेळेत पाणीपुरवठा करण्यात येत होता. यात आता बदल करण्यात आला असून सकाळी ११.३० ते दुपारी २.०० या वेळेत पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे पालिकेने कळविले आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages