अंगणवाडी कर्मचाऱ्यां चे ११ व १२ जुलै रोजी मोर्चे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

अंगणवाडी कर्मचाऱ्यां चे ११ व १२ जुलै रोजी मोर्चे

Share This
मुंबई : गेल्या २५ वर्षांपासून देशातील अंगणवाडी सेविका १० जुलै हा अखिल भारतीय मागणी दिवस म्हणून पाळत आहेत. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यात ११ व १२ जुलै रोजी मोर्चे काढले जातील.

सीटू आणि अखिल भारतीय अंगणवाडी सेविका, मदतनीस फेडरेशनच्या शुभा शमीमयांनी सांगितले की, ह्य१० जुलैला रविवार असल्याने, पुण्यात ११ जुलैला, तर मुंबईत ११ जुलैला मोर्चा काढला जाईल. एकूण २६ राज्यांमध्ये या वर्षी मोर्चे काढले जातील. देश पातळीवरील मागण्यांसोबतच स्थानिक पातळीवरील मागण्यांचा पाठपुरावा मोर्चाच्या निमित्ताने केला जाईल. दर तीन वर्षांनी केंद्र शासन अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करते.
त्यानुसार, २००८ आणि २०११ साली शासनाने वाढ केली. मात्र, त्यानंतर २०१४ साली अपेक्षित मानधनवाढ झालीच नाही. याउलट, केंद्र आणि राज्य सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आयसीडीएसवरील बजेटमध्ये कपात केली आहे. शिवाय राज्य पातळीवर दोन वेळा संप करत मोर्चे काढल्यानंतर, सरकारने मानधनवाढ व एकरकमी सेवासमाप्ती लाभ देण्याचा निर्णय घेतला. मात्र, प्रत्यक्षात सेवासमाप्ती लाभाची अंमलबजावणी अद्यापही झाली नसल्याची माहिती सीटूच्या आरमायटी इराणी यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages