पश्चिम द्रुतगती मार्ग मॉडेल रोड म्हणून तयार करणार - चंद्रकांतदादा पाटील - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पश्चिम द्रुतगती मार्ग मॉडेल रोड म्हणून तयार करणार - चंद्रकांतदादा पाटील

Share This
सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांसह आमदार आशिष शेलार यांचा पाहणी दौरा
पश्चिम द्रुतगती मार्गावरील खड्डे येत्या शुक्रवारपर्यंत भरले जातील
मुंबई दि. ८ जुलै
पश्चिम द्रुतगती मार्ग मॉडेल रोड म्हणून तयार करणार तसेच सध्या पश्चिम द्रुतगती मार्ग व पीडब्ल्यूडीच्या रस्तांवरील असणारे खड्डे येत्या शुक्रवारपर्यंत भरले जातील, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली


पश्चिम द्रुतगती मार्गावर पडलेल्या खड्यांमुळे मुंबईकरांमध्ये नाराजीचा सूर होता तसेच या बाबत वारंवार बातम्या ही प्रसिद्ध होत होत्या म्हणून मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना विनंती करून पाहणी दौरा आयोजित केला होता. आज संध्याकाळी वांद्रे येथून दौरा सुरु झाला खेरवाडी, अंधेरी, जीगेश्वरी, गोरेगावपर्यंत ज्या ज्या ठिकणी खड्डे आहेत त्या ठिकाणांची पाहणी करण्यात आली.

यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलतांना चंद्रकांत पाटील म्हणाले की हा रस्ता मुंबईतील एक मॉडेल रोड म्हणून तयार करण्यात येईल. त्याची निविदा प्रक्रिया जुलै पर्यंत पूर्ण करून ऑगस्टनंतर प्रत्येक्ष कामाला सुरवात होईल व डिसेंबरपर्यंत काम पूर्ण होईल. तसेच मुंबई महापालिकेने मागणी केल्याप्रमाणे पीडब्ल्यूडीचे मुंबईतील रस्ते त्यांच्याकडे देण्याची तयारी केली असतानाही महापालिकेने हे रस्ते अचानक स्विकारण्यास नकार देत जानेवारी २०१७ नंतर रस्ते हँडओव्हर घेवू असे सांगितले. त्यामुळे पीडब्ल्यूडीने या रस्त्यांवर निधीची तरतूद केली नव्हती. परिणामी रस्त्यांवर खड्डे दिसत आयत. परंतु आता तातडीने निधी उभा केला असून खड्डे भरण्याचे काम सुरू आहे येत्या शुक्रवार पर्यंत तक्रार करायला संधी राहणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच अभियंत्यांना निर्देशही दिले. यावेळी आमदार आशिष शेलार यांच्यासह भाजप उपाध्यक्ष सुमंत घैसासजिल्हा अध्यक्ष सुहास आडिवरेकरमुंबईचे मुख्यप्रवक्ते भालचंद्र शिरसाटअभिजित सामंत यांच्यासह पदाधिकारी व पीडब्ल्यूडीचे अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages