मुंबई 25 Aug 2016 - मुंबईत विविध ठिकाणी उंच मनोरे रचताना झालेल्या अपघातामध्ये 126 गोविंदा जखमी झाले. त्यातील 92 जखमींना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडून देण्यात आले असून 34 जखमी गोविंदांवर विविध रुग्णालया्ंत उपचार सुरू आहेत. जखमींपैकी 5 गोविंदांची प्रकृती चिंताजनक आहे.
मुंबईमध्ये यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत गोविंदा जखमी होण्याच्या प्रमाणामध्ये घट झाली आहे. गेल्यावर्षी तब्बल 364 गोविंदा जखमी झाले होते. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जखमी गोविंदांचा आकडा 71 होता तो रात्री उशीरा 126 वर गेला आहे. व्ही. एन. देसाई रुग्णालयात 16, मुलुंडचे वीर सावरकर – 2, नायर 5, गोवंडी शताब्दी 6, राजावाडी 10, मुलुंड अगरवाल 10, केईएम 14, सेंट जॉर्ज 6, ट्रॉमा केअर 7, चेंबूरचे माँ हॉस्पिटल 3, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात 8, नानावटी 1, वांद्रे भाभा 4, शीव 16 तर कूपर 6, जी. टी. 4, जे. जे. 4, गोरेगावच्या सिद्धार्थ रुग्णालयात 4 उपचारासाठी आणण्यात आले होते. अश्विनी मोरे, प्रतीक हे दोन बालगोविंदाही जखमी झाले.

No comments:
Post a Comment