गोपलेंच्या स्मारकासाठी 1 कोटी निधी देणार -- रामदास आठवले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

गोपलेंच्या स्मारकासाठी 1 कोटी निधी देणार -- रामदास आठवले

Share This
मुंबई दि 25 Aug 2016 -- मातंग समाजाचे झुंजार नेते दिवंगत डॉ बाबासाहेब गोपले यांचे मुंबईत मानखुर्द येथे भव्य स्मारक उभारणार असून त्यासाठी किमान 5 एकर जागा आणि 1 कोटी निधीची आपण तरतूद करणार आहोत अशी घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष लोकनेते तथा केंद्रियसामाजीकन्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांनी आज केली दिवंगत डॉ बाबासाहेब गोपलेंच्या स्मारकासाठी कुसुमताई गोपलें यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा करून मुंबईत भव्य स्मारक उभारणार असे नामदार रामदास आठवलेंनी यावेळी स्पष्ट केले
माता रमाबाई आंबेडकर नगर घाटकोपर पूर्व येथील शाहिद स्मारक सभागृहात दिवंगत बाबासाहेब गोपले यांची आदरांजली सभा रिपाइंतर्फे आज आयोजित करण्यात आली होती त्यावेळी नामदार आठवले बोलत होते यावेळी अध्यक्षस्थानी रिपाइंचे डी एम चव्हान तसेच रिपाइंच्या मातंग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हनुमंत साठे गौतम सोनावने तानसेन ननावरे डॉ प्रीतिष जळगावकर अमर कसबे मुश्ताक बाबा धनराज थोरात साहेबराव वैरागर चंद्रशेखर कांबळे श्रीकांत भालेराव आदी अनेक मान्यवर उपस्थित होते

दिवंगत बाबासाहेब गोपले हे मातंग समाजाच्या न्यायहक्कासाठी सतत संघर्ष करीत राहिले अनेक आंदोलने उपोषण केले त्यांच्या आंदोलनाच्या लढ्यातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ स्थापन झाले गावोगावी मातंग समाजाचा तरुण त्यांनी जागृत केला त्यांचे कर्तृत्व अफाट होते त्यांचे माझे मित्रत्वाचे संबंध होते 1995 मध्ये त्यांना आरपीआय ऐकण्यात आपल्यासोबत येण्याची तसेच त्यावेळच्या सरकार मध्ये मंत्रिपद देण्याची ऑफर दिली होती असा गोपयस्फोट नामदार आठवलेंनी केला दिवंगत आबासाहेब गोपले यांना आमदार होता आले नसले तरी मातंग समाजाला जागृत करून मातंगांमध्ये ते लोकप्रिय नेते ठरले त्यांच्या विशाल अंत्ययात्रा हजारो लोक सामील झाले होते 

 डॉ बाबासाहेब गोपलेंच्या प्रयत्नाने मातंग समाजात मोठी राजकीय जागृती झाली आहे पूर्वी बौद्धांमध्ये राजकीय जागृती वाढत असताना अत्याचाराचे प्रमाण अधिक होते मात्र आता मातंग समाजावर अत्याचार वाढत आहेत त्याचा मुकाबला करण्यासाठी बौद्ध आणि मातंग समाजाने एकत्र यायला हवे भीमशक्ती मातंग शक्ती मिळून महाशक्ती उभी करू असे आवाहन नामदार आठवलेंनी केले मातंग समाजाच्या 8 टक्के आरक्षणाला आपला विरोध नाही महाराष्ट्रात 13 टक्के एस सी च्या आरक्षणात अ ब क असे प्रकार पाडून मातंग समाज बौद्ध आणि चर्मकार समाज असे आरक्षणासाठी वर्गवारी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे आश्वासन नामदार आठवलेंनी यावेळी दिले डॉ बाबाबासाहेब गोपलेंच्या आदरांजली सभेस मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages