कांजुरमार्गमध्ये १ सप्टेंबररोजी बीआरएसपीचे महिला संमेलन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कांजुरमार्गमध्ये १ सप्टेंबररोजी बीआरएसपीचे महिला संमेलन

Share This
मुंबई | प्रतिनिधी 26 Aug 2016
बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या (बीआरएसपी) वतीने राज्यातील महिलांवर वाढते अत्याचार, दारुबंदी, महिला कल्याण आणि बालविकास या विषयांवर महिला संमेलन १ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता आर.के. हॉल. हुमा सिनेमाच्या बाजुला, कांजुरमार्ग ( प.) येथे आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाला बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे संस्थापक अध्यक्ष ऍड. डॉ. सुरेश माने मार्गदर्शन करणार आहे.
या संमेलनात राजेंद्र काळे (आदिवासी फासे पारधी संघटना), रमाताई आहिरे (महिला सक्षमीकरण, दारूबंदी), हसीना खान व बेबाक कलेक्टीव (मुस्लीम दलित संघटना), अमोल निमसाडकर (महिला शिक्षण व कल्याण अभ्यासक, टाटा इन्स्टिट्यूट), प्रियांका जाधव (भटके विमुकत महिला अभ्यासक, टाटा इन्स्टिट्यूट), हर्षाली पोतदार (जातीअंताचा सांस्कृतिक एल्गार-विद्रोही जलसा शाहीर) या संमेलनात आपले विचार मांडणार आहेत. याच सभेत विविध संघटना, पक्ष नेते व कार्यकते पक्ष प्रवेश करणार आहेत. राज्यातील अकार्यक्षम कारभाराची व राज्यकर्त्यांची मनुवादी प्रवृत्तीला तोंड देण्याकरिता बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीसक्षम पर्याय म्हणून सर्व शक्तीनिशी उतरून जनतेला न्याय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावणार आहे. त्या दृष्टीने आपल्या प्रचाराची सुरवात करणार असे सुतोवाच बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी संस्थापक अध्यक्ष ऍड. डॉ. सुरेश माने यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages