खासगी बसगाड्यांना परवानगीमुळे बेस्ट समिती सभा तहकूब - 29 ऑगस्टला बेस्टही बंद - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

खासगी बसगाड्यांना परवानगीमुळे बेस्ट समिती सभा तहकूब - 29 ऑगस्टला बेस्टही बंद

Share This
मुंबई - खासगी बसगाड्यांना मुंबई महानगर क्षेत्र परिवहन कार्यक्षेत्रात मुक्त संचार करण्याची परवानगी देण्याचा घाट राज्य सरकारने घातला आहे. मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या (एमएमआरटीए) च्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या परवानगीमुळे बेस्टच्या परिवहन विभागाचे अस्तित्वच संपुष्टात येणार आहे. या निर्णयाचा शुक्रवारी (ता. २६ ऑगस्ट) झालेल्या बेस्ट समितीमध्ये सर्वपक्षीय सदस्यांनी कडाडून विरोध केला व सभा तहकूब केली. 

काँग्रेसचे रवी राजा यांनी ही सभा तहकुबीची सूचना मांडली. त्याला सुनील गणाचार्य, सुहास सामंत, अरुण दुधवडकर, श्रीकांत कवठणकर, रंजन चौधरी, गणेश सानप तसेच काँग्रेसचे शिवजी सिंह, केदार होबाळकर, सपाचे याकूब मेनन आदी सर्वच सदस्यांनी पाठिंबा दिल्याने कामकाज न करता सभा तहकूब करण्यात आली. बेस्टला संपवण्याचा घाट घातला जात असेल तर सोमवारी होणार्‍या टॅक्सी आणि रिक्षाचालक-मालकांचा संप आहे. त्यातच बेस्टही बंद ठेवू असा इशारा गणाचार्य यांनी दिला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages