रद्द टॅक्सी परवान्यांच्या नुतनीकरणासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

रद्द टॅक्सी परवान्यांच्या नुतनीकरणासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

Share This
मुंबई, दि. 29 Aug 2016 : राज्यातील रद्द तथा व्यपगत झालेल्या टॅक्सी परवान्यांचे नुतनीकरण करण्यासाठी येत्या 31 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली. या नुतनीकरणाची मुदत संपली होती. पण टॅक्सी संघटनांची मागणी विचारात घेऊन ही मुदतवाढ देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील रद्द तथा व्यपगत झालेल्या टॅक्सी परवान्यांच्या नुतनीकरणासाटी 15 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. यासंदर्भात टॅक्सी संघटनांनी टॅक्सी परवाना नुतनीकरण करण्याच्या अभय योजनेस मुदतवाढ देण्याबाबत विनंती केली होती. संघटनांची मागणी विचारात घेऊन आता या परवान्यांच्या नुतनीकरणासाठी 31 ऑक्टोबर 2016 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. या मुदतवाढीचा लाभ घेऊन संबंधीत परवानाधारकांनी आपल्या रद्द तथा व्यपगत झालेल्या टॅक्सी परवान्यांचे नुतनीकरण करुन घ्यावे, असे आवाहन मंत्री श्री. रावते यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages