रेल्वे स्थानकात कॅन्सरग्रस्तांना मदतीच्या नावाखाली पैसे मागणाऱ्याला अटक - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

रेल्वे स्थानकात कॅन्सरग्रस्तांना मदतीच्या नावाखाली पैसे मागणाऱ्याला अटक

Share This
मुंबई - कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी मदत मागण्याच्या नावाखाली काही महाविद्यालयीन विद्यार्थी पकडले गेले होते. यानंतर असे प्रकार कमी होतील असे वाटत असतानाच कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी मदत मागण्याच्या नावाखाली रेल्वे प्रवाशांकडे पैसे मागणाऱ्या निरंजन पुजारा या व्यक्तीला घाटकोपर रेल्वे स्थानकात आरपीएफ पोलिसांनी अटक केली आहे.
चाळीस वर्षे वयाचा निरंजन रामनलिक पुजारा सर्वोदय नगर, मुलुंड या उच्चभ्रू ठिकाणी राहतो. काहीही काम न करता पुजारा मुंबईतील काही रेल्वे स्थानकांवर कॅन्सरग्रस्तांसाठी मदत करा असे म्हणून पैशांचा डबा घेऊन उभा राहतो. गेल्या काही महिन्यांपासून तो हा व्यवसाय करत होता. एक ते दोन तास उभे राहून १ ते २ हजार रुपये कमवत होता. शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता घाटकोपर स्थानकावर पुजारा पैसे जमा करत असताना रेल्वे पोलिसांनी त्याला चौकशी दरम्यान हे पैसे कोणत्या संस्थेला देणार असल्याचे विचारले. मात्र त्याला पोलिसांच्या प्रश्नाला समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. त्यामुळे त्याला पोलीस चौकीत नेऊन पैसे मोजले असता ते एक हाजार एकावन्न रुपयांच्यावर असल्याचे समजले. या जमा झालेल्या पैशांतून तो आपल्या मित्रांसह मौजमस्ती करायचा असे पोलीस चौकशीतून समोर आले आहे. चांगली नोकरी सोडून त्याने हा नवा व्यवसाय सुरु केला होता. मुलुंड-टिटवाळा येथे उच्चभ्रू वस्तीत फ्लॅट बुक केला असल्याचेही त्याने सांगितले. त्याच्यावर रेल्वे कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. अशी माहिती आरपीएफ (घाटकोपर) चे उपनिरीक्षक ब्रजेश कुमार यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages