मुंबई 22 Aug 2016 -संविधान (एकशेबावीसावी सुधारणा) विधेयक, २०१४ च्या अनुसमर्थनासाठी (Ratification) अर्थात वस्तू व सेवा कर विधेयकाच्या मंजुरीसाठी(जीएसटी) 29 ऑगस्ट रोजी राज्य विधानमंडळाचे एक दिवसाचे विशेष अधिवेशन अभिनिमंत्रित करण्याची शिफारस राज्यपालांना करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
संविधान (एकशेबावीसावी सुधारणा) विधेयक, २०१४ हे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केले आहे. या विधेयकातील सुधारणांना भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 368 खालील खंड (२) च्या उपखंड (ख) आणि (ग) मधील तरतूद लागू होत असल्यामुळे विधेयकाला राष्ट्रपतींची संमतीमिळण्यासाठी निम्म्याहून अधिक राज्य विधानमंडळांचे अनुसमर्थन आवश्यक आहे. त्यामुळे या विधेयकाच्या अनुसमर्थनासाठी राज्य विधानमंडळाचे एक दिवसाचे अधिवेशन अभिनिमंत्रित करून त्याच दिवसाच्या सभागृहाच्या बैठकीच्या समाप्तीनंतर संस्थगित करण्याविषयी राज्यपालांना शिफारस करण्याचा निर्णय घेण्यात आला.

No comments:
Post a Comment