बाल लैंगिक शोषणासंदर्भातल्या तक्रारी दाखल करण्यासाठी पॉस्को ई-बटण सेवा सुरु - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बाल लैंगिक शोषणासंदर्भातल्या तक्रारी दाखल करण्यासाठी पॉस्को ई-बटण सेवा सुरु

Share This
नवी दिल्ली - बाल लैंगिक शोषणासंदर्भातल्या तक्रारी दाखल करण्यासाठी पॉस्को ई-बॉक्स या ऑनलाईन तक्रार सेवेचा शुभारंभ केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री मनेका संजय गांधी यांच्या हस्ते झाला. अशा संदर्भातल्या गुन्ह्यांची वेळीच तक्रार करुन त्यांचे योग्य प्रकारे व्यवस्थापन व्हावे आणि पॉस्को अधिनियम 2012 अंतर्गत गुन्हेगारांवर योग्य ती कारवाई व्हावी, या हेतूने ही सेवा सुरु करण्यात आली आहे.
शाळांमध्ये अशा प्रकारच्या तक्रारी नोंदवण्यासाठी पोलिसांनी तक्रार पेट्या लावण्याचा उपक्रम राबवला, त्यावरुन अशा प्रकारची ऑनलाईन सेवा सुरु करण्याची संकल्पना अस्तित्वात आल्याचे मनेका गांधी यांनी सांगितले. या ई-बॉक्समुळे देशभरात व्यापक स्तरावर ही सेवा उपलब्ध करुन देता येईल. अशा प्रकारचे गुन्हे प्रामुख्याने नजिकच्या नातेवाईकांकडून घडण्याचे आणि ते दुर्लक्षित राहण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. अशा तक्रारीही नोंदविण्याच्या दृष्टीने ई-बॉक्स उपयुक्त आणि सुलभ असून त्यात तक्रारीबाबत गोपनीयता बाळगली जाते, अशी माहिती मेनका गांधी यांनी दिली.

http://ncpcr.gov.in/ या संकेतस्थळाच्या मुख्य पृष्ठावर पॉस्को ई-बॉक्स नावाचे बटण उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या बटणावर क्लिक केल्यानंतर ॲनिमेशन पट असणारी एक चित्रफित दाखवली जाणार असून त्याद्वारे जे घडले त्यात शोषित बालकाचा कोणताही दोष नाही आणि एखाद्या जवळच्या मित्राप्रमाणे मदत केली जाईल, हे अधोरेखित होईल. त्यानंतर तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरु होईल. तपशील नोंदवून तक्रार सादर केल्यानंतर तक्रार क्रमांक जारी केला जाईल.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages