मुंबईचे माजी महापौर हरेश्वर पाटील यांचा भाजपात प्रवेश - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 August 2016

मुंबईचे माजी महापौर हरेश्वर पाटील यांचा भाजपात प्रवेश

मुंबई दिनांक 22 Aug 2016 -मुंबईचे माजी महापौर हरेश्वर पाटील आणि त्यांच्या सुनबाई योगिता  पाटील यांनी आज हजारो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला.  माजी महापौर यायला सुरुवात झाली  असे सूचक विधान यावेळी  मुंबई भाजपा अध्यक्ष  आमदार  अॅड आशिष शेलार यांनी केले.

हरेश्वर पाटील  शिवसेनेत असताना त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष,  महापौर पदे भूषविली.  काही वर्षांपुर्वी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या सुनबाई व मुलगा दोघेही राजकारणात सक्रिय आहेत. योगिता पाटील या उत्तर मुंबई जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा म्हणून काम करीत होत्या. आज या सर्व कुटुंबीयांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार  अॅड आशिष शेलार यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी  खासदार गोपाळ शेट्टीमनिषा चौधरी,संघटन मंत्री  सुनील कर्जतकर  आणि जिल्हय़ातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेसाठी  हाती घेतलेल्या  योजना महत्वाच्या  असून त्यामुळे  आपण यावं पक्षात येण्याचा निर्णय घेतला असे योगिता पाटील  यांनी सांगितले. तर आमदार  आशिष शेलार यांनी ही माजी महापौर पक्षात यायची सुरूवात  आहे त्याची सुरुवात दहिसर पासून झाली असे सांगितले. दहिसर येथील जाहीर  सभेत हा पक्ष प्रवेश झाला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS