डॉ बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीचे महानायक - रामदास आठवले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

डॉ बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीचे महानायक - रामदास आठवले

Share This
महू दि. 21 Aug 2016 - महात्मा  गांधींनी चालविलेल्या  स्वातंत्र्य लढ्याला महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पाठिंबा होता तसेच महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी उभारलेल्या सामाजिक स्वातंत्र्याच्या लढ्याला मानवमुक्तीच्या क्रान्तिला महात्मा गांधींचा पाठिंबा होता. आधुनिक भारताच्या उभारणीचे डॉ आंबेडकर प्रमुख शिल्पकार आहेत. जगातील सर्वात मोठी संसदीय लोकशाही भारतात मजबूत उभीआहे ती केवळ डॉ आंबेडकरांनी देशाला दिलेल्या सर्वश्रेष्ठ संविधानामुळे! भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ आंबेडकर हे जगात लोकशाहीचे महानायक ठरले आहेत, असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रिय सामाजीक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

महू येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मभूमी समारक  येथे झालेल्या जाहिरसभेत ते आज  बोलत होते येथील भीमजन्मभूमी स्मारकास अभिवादन करून रामदास आठवलेंच्या नेतृत्वात तिरंगा यात्रा काढण्यात आली त्याच्या प्रारंभी झालेल्या सभेत आठवले बोलत होते या तिरंगयात्रेचे आयोजन महूचे आमदार तथा भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी केले होते. त्यात प्रमुख पाहुणे म्हणून नामदार रामदास आठवले सहभागी झाले होते यावेळी खासदार सावित्री ठाकूर रिपाइंचे सरचिटणीस  मोहनलाल पाटील आमदार रमेश कुंडोला आदी मान्यवर उपस्थित होते. भीमजन्मभूमी स्मारक महू येथून तिरंगा यात्रा सुरु होऊन स्वातंत्र्यसैनिक अमर शाहिद तंट्या मामा भिल्ल यांच्या पाताळपाणी या गावापर्यंत काढण्यात आली.

मध्यप्रदेश मधील महू हे डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जन्मभूमी म्हणून जगविख्यात झाले आहे येथिल जन्मस्थळी भीमस्मारक हि उत्कृष्ट आहे मात्र या ठिकाणी जगभरातून भीमनुयायी दर्शनासाठी येतात त्यामुळे भीमजन्मस्थळावरील स्मारकास जागा अपुरी पडत आहे. हे स्मारक लष्कराच्या जागेत आहे या भोवतीची आणखी साडे सात एकर जागा स्मारकाला द्यावी अशी देशभरातील आंबेडकरी जनतेची मागणी आहे. ती मागणी आपण लवकरच पूर्ण करू. त्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांची लवकरच भेट घेऊन प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन आठवले यांनी दिले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages