अवयव प्रत्यारोपण - गैरव्यवहार आढळल्यास कठोर कारवाई -डॉ. दीपक सांवत - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

अवयव प्रत्यारोपण - गैरव्यवहार आढळल्यास कठोर कारवाई -डॉ. दीपक सांवत

Share This
मुंबई, दि.22 Aug 2016 : अवयवदान मोठ्या प्रमाणात व्हावे तसेच गरजू रुग्णांना मूत्रपिंड उपलब्ध व्हावे व  प्रत्यारोपण प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडावी यासाठी राज्य शासनामार्फत उपाययोजना करण्यात येत आहेत. प्रत्यारोपण शस्त्रक्रियेच्या प्रकियेत गैरव्यवहार करणाऱ्यावर कठोर कारवाई करणार असल्याचेही सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज येथे सांगितले. 


मानवी अवयव प्रत्यारोपण कायद्याबाबत कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीची पहिली बैठक सावंत यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झाली. त्यावेळी ते बोलत होते. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव सुजाता सौनिकआरोग्य विभागाचे संचालक डॉ. मोहन जाधववैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. प्रविण शिनगारे यांच्यासह खासगी रुग्णालयातील कार्यकारी संचालक तसेच समितीतील इतर सदस्य उपस्थित होते.

मानवी अवयव प्रत्यारोपणाची प्रक्रिया कायद्याच्या चौकटींतर्गत पार पाडून याबाबत नेमकी कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, त्याबाबत सदस्यांनी आपल्या सूचना मांडाव्यात असे डॉ. सावंत यांनी या वेळी सांगितले.

अवयव दाता व स्वीकारणारा रुग्ण् यांची माहिती आधार कार्डाशी संलग्न करुन ऑनलाईन उपलब्ध् करुन देणेत्याबाबत संगणकप्रणाली निश्चित करणेअवयवदात्यांच्या कागदपत्रांच्या तपासणी करिता कार्यपद्धती निश्चित करणेअवयव प्रत्यारोपणानंतर  दाता व स्वीकारणारा यांच्यासाठी विशेष शिष्टाचार निश्चित करणेज्या रुग्णालयात मुत्रपिंड अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली जाणार आहे त्या रुग्णालयात स्वतंत्र कक्ष स्थापून अवयतदाता व स्वीकारणारा रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांना शस्त्रक्रियेबाबतच्या परिणामांची माहिती ध्वनीचित्रफितीव्दारे देणे आदी विषयांसह ब्रेनडेड रुग्णांच्या अवयवदानाच्या बाबतीत वाढ करण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयास महत्वाच्या वैद्यकीय सुविधा मोफत उपलब्ध करुन देणे आदी विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली व  समिती सदस्यांची मते जाणून घेण्यात आली. समिती सदस्यांनी मांडलेल्या सूचना विचारात घेऊन याबाबतची नेमकी कार्यपद्धती (SOP) लवकरच तयार करणार असल्याचे डॉ.सावंत यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages