सीएसटी स्थानकातील "एसी‘ विश्रांतिगृहाची क्षमता दुपटीने वाढवली - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

सीएसटी स्थानकातील "एसी‘ विश्रांतिगृहाची क्षमता दुपटीने वाढवली

Share This
मुंबई 23 Aug 2016 - मेल-एक्‍स्प्रेसमधील प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने सीएसटी स्थानकातील "एसी‘ विश्रांतिगृहाची क्षमता दुपटीने वाढवली आहे. केवळ 250 रुपयांत या विश्रांतिगृहात प्रवाशाला 24 तास थांबता येईल. फक्त ऑनलाईन नोंदणी व पीएनआर क्रमांक असलेल्या प्रवाशांनाच याचा लाभ घेता येईल. 

लांब पल्ल्याच्या गाडीतील प्रवाशांच्या सोईसाठी एसी विश्रांतिगृहाची क्षमता वाढवण्यात आली आहे. 2013 मध्ये मध्य रेल्वेने 74 प्रवाशांसाठी प्रायोगिक तत्त्वावर विश्रांतिगृह सुरू केले. त्याला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. आता तीन वर्षांनी पुन्हा एसी विश्रांतिगृह सुरू झाले आहे. आता येथे 148 प्रवासी आराम करू शकतील. रेल्वे टुरिझमच्या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करता येईल, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले. 


विश्रांतिगृहात 12 तासांसाठी 150 रुपये, तर 24 तासांसाठी 250 रुपये दर आहे. मुंबईतील कुठल्याही हॉटेलपेक्षा हा दर खूपच कमी आहे. या सुविधेतून रेल्वेचा नफा कमावण्याचा हेतू नसून प्रवाशांना लाभ द्यायचा आहे, असे जनसंपर्क अधिकारी ए. के. सिंग यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे प्रवास संपल्यानंतर इच्छित स्थळी जाण्याआधी 24 तास प्रवासी या विश्रांतिगृहाचा लाभ घेऊ शकतो. केवळ आरक्षित केलेले तिकीट हा पुरावा व ओळखपत्र आवश्‍यक आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages