पालिका रुग्णालय, अग्निशमन केंद्र, शाळांमध्ये वायफाय - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पालिका रुग्णालय, अग्निशमन केंद्र, शाळांमध्ये वायफाय

Share This
मुंबई, दि. 25 Aug 2016 -  मुंबईला वायफाय सिटी करण्यासाठी आता शाळा, रुग्णालये, अग्निशमन केंद्र आणि पालिकेची विविध कार्यालय वायफाय कनेक्शनने जोडण्यात येणार आहे़. अशी अनुकूलताच प्रशासनाने दर्शविली आहे़.
विधी समितीत नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी ठरावाच्या सुचनेद्वारे पालिका रुग्णालये, शाळा आणि अग्निशमन केंद्रांसह पालिकेच्या विविध कार्यालयांत वायफाय कनेक्शन देण्याची मागणी केली होती़. या ठरावाच्या सुचनेला पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी अनुकूलता दर्शविली आहे़ आजच्या घडीला केवळ पालिका मुख्यालयातील स्थायी समितीच्या दालनात वायफाय सेवा पुरविण्यात आलेली आहे़. याच सल्लागाराचा सल्ला घेऊन पालिका इमारती, शाळा, आरोग्य आणि अग्निशमन केंद्रांतही हा प्रकल्प राबवता येणे शक्य असल्याचा अभिप्राय आयुक्तांनी दिला आहे़

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages