बाबासाहेबांना डोळ्यासमोर ठेवून युपीएससीची केली तयारी - टिना डाबी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बाबासाहेबांना डोळ्यासमोर ठेवून युपीएससीची केली तयारी - टिना डाबी

Share This
मुंबई  : डॉ. बाबासाहेब आंबेडकर माझे प्रेरणास्त्रोत आणि आयडॉल आहेत. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी युपीएससी परिक्षेसाठी संघर्ष करत असल्यामुळे भारतात पहिली येवू शकले, बाबासाहेबांच्या कर्मभूमी आज होत असलेल्या सत्काराने मी भारावून गेले आहे, बाबासाहेबांच्या शतकोत्तर जयंती वर्षात भीमाच्या बेटीस घवघवीत यश प्राप्त होणे अभिमानाची गोष्ट आहे, असे हृदगत यंदा युपीएससीमध्ये अनुसूचित जमातीच्या पण खुल्या वर्गातून देशात टॉपर आलेल्या टिना डाबी हिने व्यक्त केले. सामाजिक न्याय विभाग आिण डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्यावतीने शुक्रवारी मुंबईत टिना डाबी हिचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर दोतना टिना डाबी बोलत होती. 


मी विद्यार्थीदशेतच लाल दिव्याचे स्वप्न बघितले होते. समाजात चुकीच्या गोष्टी बदलण्याची तुमची इच्छा असेल तर स्पर्धा परीक्षेपासूनच काय त्यातील यशपासूनही तुम्ही दूर राहू शकत नाही. समाजासाठी काही करण्यासाठी प्रत्येकाने आयएएस व्हायला पाहिजे असे नाही. तुम्ही कोणत्याना कोणत्या स्वरूपात समाजऋण फेडू शकता, असे टिना यावेळी म्हणाली. यावेळी टिना हिने आईचे आभार मानले. तिची आई हेमाली डाबी या मराठी असून त्या मूळच्या नागपुरच्या आहेत. 


छत्रपती शिवाजी महाराज, फुले - शाहू- आंबेडकर यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्ये रोवली. त्याचे फलित आज आपल्याला टीना डाबी या तरुणीच्या माध्यमातून पहावयास मिळत आहे. ही गोष्ट अभिमानास्पद आहे. डॉ. आंबेडकर यांच्या विचारांना आदर्श मानून तरुणांनी सनदी सेवेत करिअर करावे, असे आवाहन सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी केले. 
सत्कार सोहळ्यास बार्टीचे महासंचालक राजेश ढाबरे, अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त डॉ. हर्षदिप कांबळे, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे, दिल्लीतील पोलीस अधिकारी संदीप तामगाडगे, सनदी अधिकारी सुनिल वारे, सीमा शुल्क विभागाचे अतिरिक्त आयुक्त सतीश ढवळे, विभागीय पासपोर्ट अधिकारी अतुल गोटसुर्वे आदी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages