ऍट्रोसिटी कायद्यात बदल करता येणार नाही - केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

ऍट्रोसिटी कायद्यात बदल करता येणार नाही - केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले

Share This
नवि दिल्ली दि 29 - ऍट्रोसिटी कायदा मराठा किंवा कोणत्याही सवर्ण समाजाविरुद्ध नाही. दलितांवरील अत्याचार रोखण्यासाठी एट्रॉसिटी कायदा सर्वसंमतीने संसदेने मंजूर केलेला आहे. दलितांवर अत्याचार झालाच नाही तर ऍट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्याची वेळच येणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी ऍट्रोसिटी कायद्यात बदल करण्याची सूचना केली आहे. मात्र  आता त्यात कोणताही बदल करता येणार नाही. असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय सामाजीक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज केले. ऍट्रोसिटी कायद्याचा चुकीचा वापर करता येणार नाही  निरपराधावर  ऍट्रोसिटी नुसार कारवाई होणार नाही याची खबरदारी सामाजिक न्याय मंत्रालय घेईल असे आठवले यांनी स्पष्ट केले. 

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते शरद पवार यांनी नेहमीच दलित अत्याचार प्रतिबंधासाठी सकारात्मक भूमिका घेतली आहे. फुले शाहू आंबेडकरी तत्वज्ञान स्वीकारून काम करणारे ते वरिष्ठ नेते आहेत. त्यांचा आम्हाला नेहमी आदर राहिला आहे. कोपर्डीच्या निंदनीय घटनेचा आम्ही निषेध केला आहे. त्यातील आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे यासाठी सर्व आंबेडकरी संघटनांनी आंदोलन केले आहे. तरीही  कोपर्डीच्या घटनेची प्रतिक्रिया म्हणून निघालेल्या मराठा समाजाच्या मोर्चातुन ऍट्रोसिटी रद्द करण्याची मागणी झाली आहे. कोपर्डीतील नराधम आरोपींची जात पुढे आणली जात आहे. मात्र अश्या नराधमांना जात नसते. दलितांवर अगणित वेळा मराठा समाजाकडून अत्याचार झाले मात्र आम्ही कधी मराठा समाजाविरुद्ध आंदोलन केले नाही. आंदोलन झाले ते फक्त आरोपींविरुद्ध. दलितांनी कधीच आरोपीच्या संपूर्ण जातीविरुद्ध आंदोलन केले नाही. त्यामुळे कोपर्डीच्या घटनेची प्रतिक्रिया म्हणून मराठा आणि दलितांमध्ये दरी वाढविण्याचे प्रयत्न होत असतील तर ते रोखले पाहिजेत असे आठवले म्हणाले. 

शरद पवार हे राज्यात सर्वांनाच आदरणीय नेतृत्व आहे. त्यांनी मराठा आणि दलित समाजाला जोडण्याची भूमिका घेतली पाहिजे. ऍट्रोसिटी मध्ये बदल करून प्रश्न सुटणार नाही तर समाजाच्या मानसिकतेत बदल झाला पाहिजे. राज्यात सर्वात प्रथम आपण मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे हि दलित आणि मराठा समाजाला जोडण्यासाठी भूमिका घेतलेली आहे. दलित आणि सवर्ण मराठा समाजाला एकत्र आणण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत असे मत आठवले यांनी व्यक्त केले. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनाच्या काळात नामांतर झाल्यानंतर मराठा आणि दलित समाजातील सौहार्दासाठी अनेक ऍट्रोसिटी केसेस मागे घेण्यात आल्या होत्या. आता मात्र कोपर्डीच्या निंदनीय घटनेवरून थेट ऍट्रोसिटी रद्द करण्याची आणि त्यात बदल करण्याची मागणी चूक आहे. ऍट्रोसिटीचा गैरवापर होणार नाही त्यासाठी सरकार दक्ष राहील असे स्पष्ट करून आठवले यांनी दलित आणि मराठा समाजात द्वेषाची दरी बुजवून त्यांच्यात एकता बंधुभाव निर्माण करण्याचे आवाहन केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages