मुंबई : नगरसेवक निधीतून ओला व सुका कचरा वर्गीकरण करण्यासाठी गृहनिर्माण संस्थांना कचराकुंड्या देण्यात येणार होत्या़. मात्र या कचराकुंड्या खरेदी करण्याचा कार्यादेश निघाल्यानंतरही ठेकेदारांनी अद्याप त्याची खरेदी केलेली नाही़. त्यामुळे ओला व सुका कचरा वर्गीकरण मोहिमेलाही हरताळ फासला जात आहे़
कचराकुंडी खरेदीचा प्रस्ताव चार महिन्यांपूर्वी मंजूर झाला होता़. त्यानुसार आतापर्यंत कचराकुंड्यांचे वितरण होणे अपेक्षित होते़ मात्र अद्यापही या कचराकुंड्या विभागांमध्ये लागल्या नाहीत़. त्यामुळे नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे़. याबाबत विचारणाऱ्या नगरसेवकांना आणखी एक महिना कचराकुंड्यांचे वितरण होणार नसल्याचे अधिकाऱ्याने सांगितले़. ओला व सुका कचरा वर्गीकरण सक्तीचे करण्यात आले आहे़ यासाठी नगरसेवक निधीतून कचराकुंड्या देण्यात येणार होत्या. मात्र पालिकेकडे ओला व सुका कचरा वाहून नेणाऱ्या वेगळ्या गाड्या नसल्याने ओला व सुका कचरा पुन्हा एकत्रित करून डम्पिंगवर नेला जात आहे़. कचऱ्याचे वर्गीकरण न करणाऱ्या घाटकोपर व चेंबूर येथील रहिवाशांना पालिकेने नोटीस पाठविली़ होती. परंतु पालिकाच ओला व सुका कचरा वाहून नेण्याची सेवा देण्यास अपयशी ठरली असल्याची नाराजी विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी व्यक्त केली आहे़

No comments:
Post a Comment