दक्षिण मुंबईतील ३९ वाहनतळांच्या जागी 'मोफत पार्किंग' - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

दक्षिण मुंबईतील ३९ वाहनतळांच्या जागी 'मोफत पार्किंग'

Share This
मुंबई 23 Aug 2016 - दक्षिण मुंबईतील महापालिकेच्या 'ए' विभागांतर्गत येणा-या ३९ वाहनतळांच्या बाबत निविदा प्रक्रियेला प्रतिसाद न मिळाल्याने पुढील कंत्राटदाराची नियुक्ती होईस्तोवर या सर्व जागांवर 'मोफत पार्किंग' घोषित करण्यात आले आहे. 


यामध्ये गेटवे ऑफ इंडिया जवळील पी. जे. रामचंदानी मार्ग, विधानभवन मार्ग, जमशेदजी टाटा मार्ग, विद्यापीठ मार्ग, हॉर्निमन सर्कल, जहांगीर आर्ट गॅलरी, एन. सी. पी. ए., मरीन ड्राईव्ह यासारख्या सुपरिचित परिसरातील वाहनतळांचा समावेश आहे. या सर्व ३९ वाहनतळांच्या ठिकाणी साधारणपणे ७ हजार १४६ वाहने `पार्किंग'करता येणे शक्य आहे. यामध्ये ४ हजार ९२४ चारचाकी तर २ हजार २२२ दुचाकी वाहनांचा समावेश आहे.

या सर्व ठिकाणी 'मोफत पार्किंग' असल्याचे फलक महापालिकेद्वारे लावण्यात येत आहेत. तसेच या ठिकाणी वाहन पार्किंगसाठी कुणी पैसे घेत असल्यास त्याबाबतची तक्रार महापालिका अथवा मुंबई पोलीस यांचेकडे करता यावी यासाठी त्यांचे संपर्क क्रमांक देखील फलकावर असणार आहेत, अशी माहिती महापालिकेच्या 'ए' विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages