मुंबई 23 Aug 2016 : महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ सुविधा उपलब्ध करण्यासाठी केंद्र शासनाद्वारे महिला ई-हाट ऑनलाईन मार्केटिंग पोर्टल सुरू करण्यात आले आहे.
महिला व बालविकास विभाग तसेच महिला आर्थिक विकास महामंडळद्वारे महिला ई हाट पोर्टलचा प्रचार व प्रसार करण्याकरिता महिला ई-हाट ओळखपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सहसचिव रश्मी सक्सेना, वरिष्ठ सल्लागार मंजू कारला प्रकाश, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक कुसुम बाळसराफ व महिला उद्योजिका उपस्थित होत्या. महामंडळाच्या उपाध्यक्ष कुसूम बाळसराफ म्हणाल्या की, महिला आर्थिक विकास महामंडळ महिलांना केंद्रस्थानी ठेवून कुटुंबाचा विकास करण्यावर भर देत आहे. केंद्र शासन महिला उद्योजकांच्या उत्पादित मालाला बाजारपेठ सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महिला ई-हाट सारखा उपक्रम राबवत आहे. यामुळे महिलांनी तयार केलेल्या मालाला सहज बाजारपेठ सुविधा उपलब्ध होईल. बाजारपेठ मिळण्याबाबत येणाऱ्या अडचणी दूर होतील.

No comments:
Post a Comment