ओबीसी शिष्यवृत्तीची उत्पन्न मर्यादा सहा लाखांपर्यंत वाढवणारा शासन निर्णय निर्गमित - राजकुमार बडोले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

ओबीसी शिष्यवृत्तीची उत्पन्न मर्यादा सहा लाखांपर्यंत वाढवणारा शासन निर्णय निर्गमित - राजकुमार बडोले

Share This
मुंबई, दि. 21 Aug 2016 (प्रतिनिधी) -  विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि ओबीसी  विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी पालकांची साडे चार लाख उत्पन्नाची मर्यादा आता सहा लाखांपर्यंत वाढवणारा शासन निर्णय शनिवारी निर्गमित करण्यात आल्याची माहिती सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी आज दिली. यासंबंधीची घोषणा त्यांनी ५ ऑगस्ट रोजी विधान परिषदेत केली होती. ४ ऑगस्ट रोजी मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत सदर मर्यादा वाढवण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने मंजूरी दिल्याचे त्यांनी सांगितले होते.


विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी त्यांच्या पालकांच्या उत्पन्न मर्यादेत वाढ करण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतल्यामुळे आम्ही हा निर्णय घेऊ शकलो. त्यामुळे राज्यातील मोठ्या घटकाला दिलासा मिळाल्याचे ते म्हणाले.

विमुक्त जाती, भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग आणि ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांच्या मॅट्रीकोत्तर शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्तीकरीता पालकांच्या उत्पन्नाची मर्यादा ४ लाख ५०  हजार रूपयांवरून सहा लाख केल्यामुळे राज्यातील तब्बल ६० हजार विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.  

ही उत्पन्न मर्यादा २00०१६-१७ या शैक्षणिक वर्षामध्ये प्रथम ते चतुर्थ वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना लागू असेल. यासाठी किमान 88  कोटी रूपयांचा अतिरिक्त भार शासनावर पडणार आहे. आमच्या विभागाकडे या सर्व विद्यार्थ्यांचे पालकत्व असल्यामुळे कितीही निधी लागला तरी आम्ही मागे हटणार नाही. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यामुळे कितीही भार पडला तरी आम्ही तो सहन करू पण विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर दुष्परिणाम होऊ देणार नाही, असे ते म्हणाले.
राज्यातील शासन मान्यताप्राप्त खासगी विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित शिक्षण संस्थामधिल व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या वरील प्रवर्गातील विद्यार्थ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.   

ही उत्पन्न मर्यादा २०१६-१७  या शैक्षणिक वर्षामध्ये प्रथम ते चतुर्थ वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना लागू करण्यात येईल असे ते म्हणाले. इतर मागास प्रवर्गातील ८१  हजार ५५५ विद्यार्थ्यांना सद्या शिक्षण शुल्क मिळते, या निर्णयामुळे त्यात ४० हजार ९२ विद्यार्थ्यांची भर पडणार असून एकूण १ लाख २१ हजार विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल. विमुक्त जाती, भटक्या जमातीतील सद्याचे ३०  हजार १४३ आणि वाढीव १५ हजार २५९ अशा एकूण ४५ हजार ४०२ विद्यार्थ्यांना लाभ होईल, असेही बडोले यांनी स्पष्ट केले. तसेच विशेष मागास प्रवर्गातील सद्याच्या ८ हजार ३६९ आणि उपरोक्त निर्णयाने वाढीव ३ हजार ९६६ अशा एकूण १२ हजार ३२७ विद्यार्थ्यांना यामुळे लाभ मिळणार असल्याचे बडोले यांनी सांगितले

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages