जात प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया सोपी करणार - बडोले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

जात प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया सोपी करणार - बडोले

Share This
मुंबई 19 Aug 2016 : राज्यातील अनुसूचित जाती-जमातीच्या नागरिकांसाठी जात प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया सोपी करणार असल्याचे आश्‍वासन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी शुक्रवारी दिले. सद्यस्थितीत जात प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया अवघड असल्याचे भाजपाचे ज्येष्ठ आमदार मंगलप्रभात लोढा यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी हे आश्‍वासन दिले. याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत विशेष बैठक बोलावण्यात येईल, असेही सामाजिक न्यायमंत्री बडोले यांनी या वेळी स्पष्ट केले.
मंत्रालयातील सामाजिक न्यायमंत्री बडोले यांच्या दालनात शुक्रवारी आयोजित केलेल्या बैठकीत आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सध्या राज्यात जात प्रमाणपत्र प्राप्त करण्याची प्रक्रिया अत्यंत त्रासदायी असल्याचे आमदार लोढा यांनी निदर्शनास आणून दिले. त्यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जात प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया सुलभ करण्याची विनंती केली. त्यांच्या विनंतीची दखल घेताना याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक बोलावण्यात येईल, असे आश्‍वासन सामाजिक न्यायमंत्र्यांनी दिले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages