मुंबई / प्रतिनिधी : कर्मचार्यांच्या हातचे काम काढून घेणारा यांत्रिक झाडू आणण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाविरोधात तसेच विविध प्रलंबित मागण्यांसाठी शुक्रवारी मुंबई महापालिकेच्या घनकचरा विभागातील शेकडो सफाई कर्मचार्यांनी मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधले. म्युनिसिपल मजदूर युनियनच्या नेतृत्वाखाली पालिका मुख्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चाच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेऊन मागण्यांबाबत निवेदन सादर केले.
विविध रिक्त पदे त्वरित भरणो, मृत कर्मचार्यांचे दावे निकाली काढणो, खाडाबदली, बदली कामगारांचे सेवा सातत्याचे लाभ देणो, सुरक्षिततेबाबत साधणो पुरेसा व वेळेवर उपलब्ध करण्यात यावे, सफाई कर्मचार्यांच्या चौक्या अद्ययावत करणो, पाणी, शौचालय, कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र जागा या सर्व बाबींची पूर्तता करण्याचा निर्णय झालेला असतानाही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. संघटनेने याबाबत सातत्याने पाठपुरावा करूनही प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नसल्याने कर्मचार्यांमध्ये असंतोष आहे. यातच कर्मचार्यांचे दैनंदिन प्रश्न न सोडवता त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी विभागातील कचरापेट्या कोणतीही पूर्वसूचना न देता काढून टाकणो, यांत्रिक झाडूचा वापर करण्याचा प्रस्ताव असे प्रकारही प्रशासनाने सुरू केले आहेत. यामुळे कर्मचार्यांच्या कामाच्या बोजामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. कामगारांच्या हातचे काम काढून घेणारा यांत्रिक झाडू काढून घेण्याचा प्रयत्न प्रशासनाचा आहे. हळूहळू कामगार कपातीचे धोरण आखून मोठय़ा प्रमाणात खाजगीकरण करण्याचा प्रशासनाचा कुटिल डाव असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. कर्मचार्यांच्या हातचे काम काढून घेण्यास कारणीभूत ठरणारा यांत्रिक झाडू पालिका प्रशासन रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न करत आहे.हा प्रयत्न हाणून पाडू, असा इशारा संघटनेचे महाबळ शेट्टी, शशांक राव यांनी या वेळी दिला.
No comments:
Post a Comment