मुंबई - कचरा डेपोवरील ताण कमी करण्यासाठी ओला व सुखा कचऱ्याच्या वर्गीकरणावर पालिका भर देत आहे. ओला आणि सुका कचरा वेगळा करण्यासाठी महापालिका प्रत्येक घरात कचऱ्याचे डबे पोहोचवणार आहे. त्यासाठी तब्बल 10 लाख डब्यांच्या खरेदीसाठी पालिका तब्बल 11 कोटी 30 लाख रुपये खर्च करणार आहे. मुंबई महानगरपालिकेकडे ओला व सुखा कचरा वाहतुकीसाठी सध्या व्यवस्था न नसताना हा खर्च केला जात आहे.
मुंबईत दिवसाला 9,400 मेट्रिक टन कचरा गोळा होतो. त्यातील 5 हजार 76 मेट्रिक टन ओला कचरा असतो; मात्र ओला व सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण होत नसल्याने ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती आणि सुक्या कचऱ्याचा फेरवापर होत नाही. हा सर्व कचरा थेट कचरा डेपोत टाकला जात असल्याने मुलुंड आणि देवनार येथील कचरा डेपो क्षमता नसतानाही वापरावे लागत आहेत. यावर उपाय म्हणून म्हणून पालिकेने कचऱ्याचे वर्गीकरण करून त्याची प्रत्येक विभागात विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी प्रत्येक घरात कचऱ्याचे वर्गीकरण होणे गरजेचे आहे, हे लक्षात घेऊन नगरसेवकांमार्फत घरोघरी कचऱ्याचे डबे पुरवले जाणार आहेत. 10 लाख डबे पालिका खरेदी करणार आहे. त्यासाठी 11 कोटी 30 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. तसा प्रस्ताव बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीत मंजुरीसाठी येणार आहे. 10 लिटर क्षमतेचे हे डबे असून प्रत्येक नगरसेवकामार्फत डबे पुरवले जाणार आहेत. त्यासाठी नगरसेवकांनी अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद केली आहे. प्रत्येक महिन्याला मागणीनुसार डब्यांची खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महिन्याला किमान एक लाख डबे वितरित करण्याचा पालिकेचा विचार आहे.