मुंबई, दि. १८: ‘मॅन ऑफ द ईयर’ पुरस्काराने गौरवांकित होत असताना राज्यात १ जुलै २०१६ रोजी लोकसहभागातून झालेल्या २ कोटी ८२ लाख वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाची नोंद घेतल्याचे ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’चे प्रमाणपत्रही आजच मिळाले. या दोन्ही गोष्टी खूप आनंददायी असल्याचे प्रतिपादन वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
ज्युनिअर चेंबर इंटरनॅशनल मरीन लाईन्स (जेसी) च्या वतीने आज पद्मविभूषण डॉ. बी. के गोयल यांच्या हस्ते वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा ‘मॅन ऑफ द ईयर’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ‘वूमन ऑफ द ईयर’ पुरस्काराने सन्मानित झालेल्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (एमएमआरसी) व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे, ॲड. उज्ज्वल निकम, जेसीचे फाऊंडर चेअरमन जीवराज शहा, इंदर जैन, प्रेम लुणावत यांच्यासह जेसीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. याच कार्यक्रमात डॉ. सुजाता वासानी आणि डॉ. अमित कुमार शर्मा यांना ‘आऊटस्टॅण्डिंग यंग पर्सन अवॉर्ड’ ने सन्मानित करण्यात आले.
वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या ६ लाख ५२ हजार लोकांच्या वतीने मी हा पुरस्कार स्वीकारतो असे सांगून मुनगंटीवार म्हणाले की, माणसाला लागणारा ऑक्सिजन झाडांपासूनच मिळत असल्याने वृक्ष लावणे हे प्रत्येकाच्या जीवनाचे कर्तव्य झाले पाहिजे. येत्या तीन वर्षात राज्यात ५० कोटी झाडे लावण्याचा शासनाचा संकल्प असून येत्या १ जुलै २०१७ रोजीच्या ३ कोटी वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात जेसीनेही सहभाग घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. स्वत: कमावलेले पैसे स्वत:साठी खर्च करणे हा माणसाचा स्वभाव असतो परंतु स्वत: कमावलेले पैसे समाजासाठी खर्च करणे ही भारतीयांची संस्कृती आहे आणि जेसी ही संस्कृती यशस्वीपणे पुढे नेत असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्यात जनहिताचे आणि विकासाचे प्रकल्प राबवित असताना त्याला व्यापक लोकपाठिंब्याची गरज असते असे सांगून ‘वुमन ऑफ द ईयर’ पुरस्काराने सन्मानित झालेल्या अश्विनी भिडे म्हणाल्या की, अशी कामे करताना शासन- प्रशासन आणि जनता यांच्यात एकमेकांविषयी विश्वास असणे, आदर असणे गरजेचे असते. शासन ही बहुआयामी स्वरूपात काम करणारी यंत्रणा आहे. शासकीय यंत्रणा व्यापक लोकहिताचा विचार करून निर्णय घेत असते. एमएमआरसीमार्फत करण्यात येत असलेल्या कामांमुळे मुंबई शहरातील वाहतूक व्यवस्था कार्यक्षम आणि गतिमान होण्यास मदत होईल.
विधायक कामे करण्यासाठी तरूणांनी पुढे येण्याची गरज व्यक्त करून पद्मश्री ॲड. उज्ज्वल निकम म्हणाले की, सामाजिक स्वास्थ्य बिघडत गेल्याने लोकशाहीला मोठा धोका निर्माण होतो. त्यामुळे समाजस्वास्थ्य बिघडवणाऱ्यांपासून लोकांनी नेहमी सावध राहायला हवे. आयुष्य म्हणजे फक्त आनंदाने बागडायचे क्रीडांगण नसून आलेल्या प्रत्येक घटनेला पूर्ण सामर्थ्याने सामोरे जाणे म्हणजे जीवन आहे.
यापूर्वी जेसीतर्फे ‘मॅन ऑफ द ईयर’ पुरस्काराने माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, यांच्यासह दिवंगत गृहमंत्री आर. आर. पाटील तसेच प्रमोद महाजन आदी मान्यवरांना गौरविण्यात आले आहे.