मुंबई, दि. १६ :- विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे उद्या शनिवार, 17 सप्टेंबर 2016 रोजी पालघर व ठाणे जिल्ह्यातील कुपोषणग्रस्त आदिवासी भागांचा दौरा करणार असून आपल्या दौऱ्यात ते मोखाडा, खोच, खर्डी, कळंबवाडी, वाडा भागातील कुपोषणग्रस्त गावांना भेट देणार आहेत.
धनंजय मुंडे हे आपल्या दौऱ्यात, कुपोषणग्रस्त भागातल्या आदिवासी कुटुंबीयांच्या घरी भेट देतील, तसेच स्थानिक गावकऱ्यांशी चर्चा करुन वस्तुस्थिती जाणून घेतील. जिल्ह्यांतील प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालय, आश्रमशाळांनाही मुंडे भेट देणार आहेत. आमदार आनंद ठाकूर, पांडुरंग वरोरा यांच्यासह पक्षाचे स्थानिक नेतेही त्यांच्या सोबत या दौऱ्यात असतील.
राज्याच्या आदिवासी विकासमंत्र्यांच्या पालघर व ठाणे जिल्ह्यातील बालकांचे कुपोषणामुळे होत असलेले मृत्यू ही गंभीर बाब असल्याकडे मुंडे यांनी लक्ष वेधले असून मुंबईसारख्या महानगरापासून जवळच असलेल्या आदिवासी भागात कुपोषणाची गंभीर बनलेली समस्या सोडवण्यात शासनाला आलेले अपयश ही दुर्दैवी बाब असल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे.

कुपोषण रोखण्यात आणि राज्यपालांच्या आदेशीची अंमलबजावणी करण्यात राज्य शासनाकडून दाखवण्यात येणारी अनास्था क्लेशदायक असून कुपोषित बालकांच्या मृत्युबद्दल हलगर्जीपणा व असंवेदनशीलता यास आदिवासी विकास विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग तसेच महिला व बालविकास विभाग जबाबदार असल्याचा आरोप मुंडे यांनी केला आहे. ते आपल्या दौऱ्यासंदर्भातील अहवाल पक्षनेतृत्वाकडे सादर करणारआहेत. आदिवासी मंत्री विष्णू सावरा यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी हि त्यांनी केली आहे