मुंबई / प्रतिनिधी - मुंबई महानगरपालिकेने सण उत्सव साजरे करण्यासाठी तात्पुरते मंडप उभारण्यास शुल्कामधे वाढ केली आहे. या परिपत्रकामुले कोणत्याही धर्माचे धार्मिक सण साजरे करताना एखादा इव्हेंट आयोजित केल्या प्रमाणे शुल्क आकारले जाणार आहे. यामुले या परिपत्रकातून धार्मिक सणाला वगळावे, धार्मिक सणाला इव्हेंट प्रमाणे शुल्क आकारू नए अशी ठरावाची सूचना समजावादी पक्षाचे नगरसेवक अशरफ आझमी यांनी सभागृहात मांडली आहे.
धार्मिक सणासाठी जास्त शुल्क आकारु नये असा कायदाच पालिका सभागृहात करावा अशी मागणी आझमी यांनी केली आहे. दरम्यान याची दखल घेत पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी पालिकेच्या परिपत्रकात बदल केले असून धार्मिक व सामजिक कार्यक्रमाला पूर्वी प्रमाणेच शुल्क आकरावे असे परिपत्रक काढले आहे.
मुंबई महानगरपालिकेमधे गेले 25 ते 27 वर्षे शिवसेना आणि भाजपाची सत्ता आहे. काही दिवसापूर्वी पालिका प्रशासनाने एक परिपत्रक काढले आहे. या पत्रकानुसार 500 चौरस फुटाच्या मंडपासाठी एका दिवसासाठी 11 हजार तर सात दिवसासाठी 23 हजार रुपये, 1000 चौरस फूटाच्या पर्यंतच्या मंडपाला एक दिवसासाठी 15 हजार 500 तर 7 दिवसासाठी 39 हजार 500 रुपये, 1000 चौरस फूटावरील मंडपाला एका दिवसासाठी 27 हजार तर 7 दिवसासाठी 51 हजार रुपये आकारले जाणार आहेत.
इतकेच नव्हे तर लग्न समारंभासाठी 1000 चौरस फूटाच्या पर्यंतच्या मंडपाला 8 हजार 500 तर त्यावरील मंडपाला 12 हजार 150 रुपये, साखरपुडा सारख्या कार्यक्रमासाठी 1000 चौरस फूटाच्या पर्यंतच्या मंडपाला 5 हजार 900 तर त्यावरील मंडपाला 8 हजार 100 रुपये शुल्क म्हणून आकरावे असे परिपत्रकात म्हटले आहे. अश्या परिपत्रकामुले मुंबईकर नागरिकांना आपले धार्मिक सण साजरे करणे खर्चिक होणार आहे.
सत्ताधारी शिवसेनेच्या सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी हिंदू धर्मियांच्या गणेशोत्सवात उभारल्या जाणाऱ्या मंडपाला यातून सूट मिळावी अशी मागणी केली होती. त्यावर आयुक्तानी गणेशोत्सवात मंडपाला असे दर आकारु नये असे आदेश दिले होते. परंतू शिवसेना किंवा प्रशासनाने इतर धर्मियांचा विचार न केल्याने सर्वच धर्मियांच्या धार्मिक सणासाठी उभारल्या जाणाऱ्या मंडपाला या परिपत्रकातून सूट मिळावी अशी मागणी अशरफ आझमी यांनी केली आहे. आझमी यांच्या मागणीची दखल आयुक्तांनी घेउन नव्या दराप्रमाणे शुल्क आकारण्याच्या परिपत्रकात बदल केले आहेत.