बीडीडी चाळीतील रहिवाश्यांना 575 चौरस फुटाचे मालकी हक्काचे घर द्या - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बीडीडी चाळीतील रहिवाश्यांना 575 चौरस फुटाचे मालकी हक्काचे घर द्या

Share This
मुंबई / प्रतिनिधी - राज्यातील भाजपा आणि शिवसेनेच्या सरकारने शुक्रवारी जाहिर केलेल्या गृहनिर्माण धोरणाबाबत मुंबईमधील बीडीडी चाळीतील रहीवाश्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. बीडीडी चाळीबाबत धोरण जाहिर करताना रहिवाश्यांना विश्वासात का घेतले नाही असा प्रश्न अखिल बीडीडी चाळी सर्व संघटना एकत्रित संघाच्या वतीने पत्रकार परिषदेत विचारला आहे.

एकत्रित संघाच्या वतीने मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषद बीडीडी चाळीतील रहिवाश्यांना मालकी हक्काची 575 चौरस फुटाचे घर मेंटेनंस फ्री द्यावे, नव्या इमारतीचे बांधकाम होताना परिसरातच राहण्याची व्यवस्था करावी, 1995 - 2000 च्या सरकारी धोरणा नूसार स्टॉल व झोपड़ी धरकांना संरक्षण मिळावे, प्रकल्प पूर्ण होण्यासाठी हस्तांतराच्या प्रलंबित प्रकरणाचा लवकर निपटारा करावा अश्या मागण्या पत्रकार परिषदेत करण्यात आल्या. यावेळी बीडीडी चाळीशी सलग्न असलेल्या रहिवाशी महासंघाचे अरविंद वाघमारे, डॉ. राजू वाघमारे, भाडेकरू महासंघाचे डॉ. अजय नकाशे, भाडेकरू हक्क संरक्षण समितीचे किरण माने, रहिवाशी संघाचे लक्ष्मण देशनेरे, दुकानदार संघाचे सुधाकर साटम, स्टॉल धारक संघाचे रविंद्र मयेकर, उपक्रम सेवा समितीचे भाई राउत, झोपडपट्टी उत्कर्ष संघाचे श्रीकांत सुकाशे आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages