गुजरातहून आणलेला साडेपाच हजार किलो नकली मावा जप्त - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

गुजरातहून आणलेला साडेपाच हजार किलो नकली मावा जप्त

Share This
मुंबई : गुजरातहून नकली मावा आणला गेल्याची माहिती एफडीएच्या दक्षता विभागाला मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी बोरीवली येथील रायडोंगरी परिसरातील नामदेव कदम चाळीतील रूम नंबर ३ मध्ये एफडीएच्या अधिकाऱ्यांनी छापा मारला. त्यात ५ हजार ७०० किलो मावा जप्त करण्यात आला. याची किंमत ९ लाख ११ हजार ४० रुपये इतकी आहे.

गणेशोत्सवाच्या काळात नैवेद्य दाखवण्यासाठी या काळात मोदकांची मागणी वाढते. त्याचबरोबर पेढे, बर्फी अशा गोड पदार्थांचीही मागणी वाढल्याने माव्याची मागणी वाढते. मागणी वाढल्यावर अनेकदा बाजारात भेसळीयुक्त माल आणला जातो. सध्या मोदकासाठी दूध घोटून तयार केल्या जाणाऱ्या माव्याची मागणी वाढली आहे. पण, त्याऐवजी मावासदृश पदार्थ बाजारात आला आहे. हा नकली मावा गुजरातहून आणला आहे. या प्रकरणी मोहनसिंग रोडासिंग राजपूत याच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. मोहनसिंग याच्याकडे खाद्यपदार्थ विक्रीसाठी लागणारा आवश्यक परवाना नसल्याचेही या तपासात उघड झाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages