राज्य सरकारच्या धर्तीवर पालिकेच्या सैनिकांचेही वेतन निश्चित होणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

राज्य सरकारच्या धर्तीवर पालिकेच्या सैनिकांचेही वेतन निश्चित होणार

Share This
मुंबई - महाराष्ट्र शासनाच्या माजी सैनिकांच्या वेतनाच्या परिपत्रका प्रमाणे पालिकेने देखील सैनिकांचे वेतन निश्चित करण्याचा विचार केला आहे अशी माहिती मनसेचे नगरसेवक दिलीप लांडे यांनी दिली

पालिकेच्या अग्निशमन दलात अग्निशामक पदाच्या भरतीत माजी सैनिकांवर अन्याय करणा-या अधिका-याची चौकशी करून न्यायालयात सुनावणीवर झालेला खर्च त्यांच्या वेतनातून वळीत करावा या मागणीसह आदी मागण्यांचे निवेदन मनसेचे नगरसेवक दिलीप लांडे यांनी आज पालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेऊन दिले आणि सविस्तर चर्चा केली त्यावेळी पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी महाराष्ट्र शासनाच्या माजी सैनिकांच्या वेतनाच्या परिपत्रका प्रमाणे पालिकेने देखील सैनिकांचे वेतन निश्चित करण्याचा विचार आहे असे आश्वासन दिले तसेच अग्निशामक पदाची भरती रद्द करून नव्याने भरती करण्यात येईल असेही आश्वासन पालिका आयुक्तांनी दिले असल्याचे लांडे यानी सांगितले.

नगरसेवक लांडे यांनी पालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात अग्निशामक पदाच्या भरतीसाठी एकूण 774 पैकी 116 पदे ही माजी सैनिकांसाठी राखीव असताना बोरिवली येथील केंद्रावर मुलाखतीसाठी गेलेल्या माजी सैनिकांचा अपमान करत रोखले आणि त्यांच्याकडे 12 वी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र मागितले प्रत्यक्षात भारतीय सैनिक पदवी कायद्या प्रमाणे सैन्यातुन सेवा निवृत झालेल्या सैनिकांस 10 वी उत्तीर्ण झाल्यास त्यास पदवी उत्तीर्ण झाल्याचा समकक्ष मानले जाते पण अग्निशमन दलाच्या अधिका-यांनी त्यास जुमानले नाही याबाबतीत सैनिक मंडळ यांनी दिलेल्या सुचनेचे पालन केले नाही असाही निवेदनात लांडे यानी उल्लेख केला आहे

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages