मच्छिमार नौकांच्या डिझेल सबसिडीबाबत सकारात्मक निर्णय घेणार - महादेव जानकर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 September 2016

मच्छिमार नौकांच्या डिझेल सबसिडीबाबत सकारात्मक निर्णय घेणार - महादेव जानकर

मुंबई, दि. 12 : मच्छिमार नौकांसाठी देण्यात येणाऱ्या डिझेल सबसिडीबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. मच्छिमार बांधवांचे प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येतील,असे मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांनी आज येथे सांगितले.
मढ आयलंड येथे कोळी समाजातर्फे आयोजित कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी जानकर बोलत होते. मढ परिसरातील कोळी बांधवांचा जेट्टीचा आणि मढवर्सोवा पुलाचा प्रश्नही सोडविण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमानंतर जानकर यांनी परिसरातील विविध मच्छिमार सहकारी संस्थांना, तसेच जेट्टीला भेट देऊन पाहणी केली. यावेळी मच्छिमार संस्थांचे पदाधिकारी आणि मच्छिमार बांधव उपस्थित होते.

Post Bottom Ad

JPN NEWS