सनातन संस्थेवर बंदीसाठी आणखी कोणता पुरावा हवा ? - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

सनातन संस्थेवर बंदीसाठी आणखी कोणता पुरावा हवा ?

Share This
मुंबई - सनातन संस्थेवर बंदी घालण्यासाठी सरकारला अजून कोणत्या पुराव्यांची गरज आहे, असा थेट सवाल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारला केला आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) उच्च न्यायालयात सनातन संस्थेबाबत सादर केलेले पुरावे लक्षात घेता, सनातनसंदर्भात सरकारची भूमिका स्पष्ट होण्याची गरज असून, सनातनवर तातडीने बंदी घाला, अशी मागणी त्यांनी केली आहे.
विरोधी पक्षनेते विखे पाटील म्हणाले, ""डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांची हत्या झाल्यानंतर सनातन संस्थेवर सरकारने बंदी घालावी, अशी मागणी आम्ही सातत्याने करीत होतो; परंतु सरकारमधील मंत्री सबळ पुराव्याचे कारण देत वेळ मारून नेत होते. सरकारने सनातनबाबत कधीही भूमिका स्पष्ट न केल्याने सामाजिक कार्यकर्ते आणि साहित्यिकांना संस्थेचे कार्यकर्ते उघडपणे धमक्‍या देऊ लागले.‘‘ राज्यातील गुन्हेगारी वाढण्यास सरकारचा हलगर्जीपणाच कारणीभूत ठरला आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे या दोन्ही हत्यांचा तपास सीबीआयने पुढे आणला, हे राज्याच्या गृह विभागाचे मोठे अपयश आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages