पालिकेच्या लाचखोरीबद्दल उघडपणे बोलला त्याबद्दल कपिलचे अभिनंदन - संजय निरुपम - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पालिकेच्या लाचखोरीबद्दल उघडपणे बोलला त्याबद्दल कपिलचे अभिनंदन - संजय निरुपम

Share This
मुंबई - कॉमेडियन कपिल शर्मा याला मुंबई महानगरपालिकेकडून काम करून घेण्यासाठी रुपये ५ लाख लाच द्यावी लागली. तो या लाचखोरीबद्दल उघडपणे बोलला, त्याबद्दल मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.
ते पुढे म्हणाले कि, गेल्या २० वर्षांपासून शिवसेना भाजपची मुंबई महानगरपालिकेत सत्ता असून त्यांनी भ्रष्टाचाराचा कळस गाठलेला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या प्रत्येक खात्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार, लाचखोरी आणि घोटाळे सुरु आहेत. शिवसेना आणि भाजपा या सगळ्याला संरक्षण देत आहे. या सगळ्याची चौकशी होत नाही. फक्त ठेकेदार आणि इंजिनिअर यांच्यावर ठपका ठेवला जातो. या सर्व घोटाळ्यात व भ्रष्टाचारात शिवसेना व भाजपचे नेते गुंतलेले आहेत. त्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे. मुंबई महानगरपालिका हि भ्रष्टाचारामध्ये जगात सर्वात मोठी महानगरपालिका आहे, याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लाज वाटली पाहिजे.

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम पुढे म्हणाले कि, मुंबई महानगरपालिका मुंबईतील सर्व सामान्य जनतेला चांगले व खड्डेमुक्त रस्ते, स्वच्छता, नाले सफाई, मुबलक पाणी, अशा साध्या पण महत्वाच्या सोयी सुविधा देण्यात संपूर्णतः अपयशी ठरलेली आहे. म्हणूनच मी ६ महिन्यापूर्वी मुंबई महानगरपालिका बरखास्तीची मागणी केली होती. आता पुन्हा एकदा मी मागणी करतो कि, मुंबई महानगरपालिका त्वरित बरखास्त करावी. तसेच रस्ते घोटाळा,नालेसफाई घोटाळा, कचरा घोटाळा असे जे अनेक घोटाळे मुंबई महानगरपालिकेच्या प्रत्येक खात्यात झालेले आहेत, त्याची सीबीआई सारख्या मोठ्या एजन्सी कडून सखोल चौकशी होऊन कारवाई झाली पाहिजे. शिवसेना व भाजपा नेते, ठेकेदार, अधिकारी यांची नावे घोटाळ्याच्या चौकशीत टाकली पाहिजेत आणि चौकशी होऊन त्वरित कारवाई झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages