मुंबई महापालिकेचा डांबरातही घोटाळा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबई महापालिकेचा डांबरातही घोटाळा

Share This
मुंबई - मुंबई महापालिकेत रस्तेदुरुस्ती घोटाळा गाजत असतानाच खड्डेदुरुस्तीसाठी पालिकेच्या वरळीतील "अस्फाल्ट प्लांट‘मधून पुरवले जाणारे डांबरातही घोटाळा झाल्याचे उजेडात आले आहे. या प्लांटमधून पुरवल्या जाणाऱ्या डांबराच्या वजनाबाबत पालिकेच्या लेखा परीक्षकांनी 2011-12 या वर्षाच्या अहवालात संशय व्यक्त केला आहे. लेखापरीक्षकांनी पालिकेच्या स्थायी समितीसमोर हा अहवाल नुकताच सादर केला.
वरळीतील प्लांटमधून एकाच प्रकारच्या गाड्यांमधून डांबराचे मिश्रण पाठवण्यात येत असले, तरी प्रत्येक वाहनाचे वजन वेगवेगळे नोंदवण्यात आले. त्यामुळे पालिकेच्या प्रभाग कार्यालयांना डांबराचे कमी मिश्रण पोचले, असा ठपका या अहवालात ठेवण्यात आला आहे. भायखळा येथील ई प्रभाग कार्यालयात आलेल्या मिश्रणाची तपासणी करताना हा प्रकार उघड झाल्याचेही त्यात नमूद आहे. त्यामुळे जास्त वजनाच्या पावत्या जोडून संबंधितांकडून खर्च वाढवून दाखवला जात असल्याची शक्‍यता वर्तवण्यात येते.

रस्त्यांवरील खड्‌डे बुजवणे आणि रस्ते दुरुस्तीसाठी पालिकेला या प्लांटमधूनच 20 ते 25 हजार मेट्रिक टन डांबराचे मिश्रण पुरवले जाते. या वर्षी पावसाळ्यात आतापर्यंत 15 हजार मेट्रिक टन मिश्रण पुरवले गेले. डांबर-खडीचे मिश्रण तयार करण्यासाठी प्रत्येक किलोमागे 3 ते 3.50 रुपयांचा खर्च येतो. वर्षाला आठ ते नऊ कोटी रुपयांचे मिश्रण पालिकेच्या सर्व प्रभाग कार्यालयांमध्ये पाठवले जाते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages