मुंबई / प्रतिनिधी
मुंबईमधील बहुसंख्य नागरिक हे झोपडंपट्टीत राहतात. लोकसंख्या वाढी बरोबरच त्यांच्या गरजांची व आरोग्य, स्वच्छता, पाणी इत्यादी सोयी सुविधा यांची पूर्तता करण्यास पालिकेला अपयश येत आहे. त्यातच झोपड्यांमध्ये लहान घरांमुळे लोकांना त्यांच्या नेहमीच्या गरजांची पूर्तता करणे शक्य नसल्याने झोपड्यांची उंची १४ फुटांवरून २० फूट करावी अशी मागणी समाजवादी पक्षाचे नगरसेवक अश्रफ आझमी यांनी पालिका सभागृहत केली.
मुंबईची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. टाटा, आर. एम. शर्मा आणि वर्ल्ड बँक या तीन संस्थांनी केलेल्या सर्व्हेनुसार मुंबईच्या १२ टक्के जमिनीवर ६२ टक्के लोक राहत आहेत. हे सर्व झोपड्यामधून राहणारे लोक आहेत. झोपडपट्टीत राहणाऱ्या ५६ टक्के लोकांकडे एकच रूम असून त्यामध्ये ३ ते ७ लोक राहत आहेत. लहान रूम मध्ये राहणाऱ्या लोकांना जागे अभावी स्वतंत्र स्वयंपाकगृह, स्वच्छतागृह यांची सोया नसते. मुंबईमधील ६७ टक्के लोक जे काम करतात त्यामधून त्यांना ५ ते १० हजार इतके तुटपुंजे वेतन मिळत असते. त्यातच झोपडपट्टीमध्ये असलेल्या अस्वच्छतेमुळे येथे राहणाऱ्या नागरिकांना टीबी, एमडीआर टीबी, इडीआर टीबी, यासारखे रोग होत असतात. तसेच वेगवेगळ्या आजारांना बळी पडावे लागते.
झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांना यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असते. झोपडंपट्टीमध्ये आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याचा परिणाम इतर इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांवरही होऊ शकतो. यामुळे पालिका प्रशासनाने सर्व वसाहतींमध्ये स्वच्छ व पुरेसा पाण्याचा पुरवठा, स्वच्छतागृहे, आरोग्यविषयक मदत पोहचवावी. मुंबईमधील २०१६ मोकळे भूखंड काही मोजक्या राजकारण्यांचा ताब्यात आहेत. त्यातील एक एक प्लॉट अडीच एकरहून मोठा आहे. मुंबईमधील मोकळ्या जागा काही लोकांनी आपल्या ताब्यात ठेवल्या असताना झोपडीमध्ये राहणाऱ्या लोकांना मात्र आपली घरे वाढवण्यास वाव राहिलेला नाही. यामुळे झोपडयांची उंची १४ फुटांवरून २० फूट करावी अशी मागणी आझमी यांनी केली आहे.
मुंबईमधील झोपडयांची उंची १९ फुटांची करावी अशी मागणी पालिकेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण छेडा यांनीही केली आहे. यानंतर आता समाजवादी पक्षाचे नगरसेवक अश्रफ आझमी यांनीही झोपड्यांची उंची २० फूट करण्याची मागणी केली आहे. झोपड्यांची उंची वाढवल्यास झोपडपट्टीत एक रूम असलेल्या ५६ टक्के लोकांना याचा फायदा होणार असून त्यांना एक माळा वाढवण्याची परवानगी मिळणार आहे. याबाबत आम्ही उंचीचा निर्णय घेत नसलो तरी सभागृहातील मागण्यांबाबतच्या भावना राज्य सरकार पर्यंत पोहचवण्याचे काम करू. राज्य सरकार याबाबत काय तो निर्णय घेईल असे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment