गरिबांच्या अवयवदानाचा खर्च मुंबई महापालिका उचलणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

गरिबांच्या अवयवदानाचा खर्च मुंबई महापालिका उचलणार

Share This
मुंबई / प्रतिनिधी - मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या गरीब व गरजू रुग्णाच्या अवयवदानाचा खर्च महापालिका करणार आहे. त्यासाठी पुढील वर्षापासून एक कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे अशी माहिती आरोग्य समितीचे अध्यक्ष प्रशांत कदम यांनी दिली.
मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात गरीब रूग्ण उपचार घेत असतात. पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेणार्या रुग्णाला अवयवदान करावयाचे असल्यास राज्य सरकारच्या अवयवदान समितीच्या मेरिटवरील अवयव प्रत्यारोपण करणाऱ्या रुग्णाकड़े पैसे नसल्यास हे प्रत्यारोपण होत नाही. यामुळे अवयव दान करणाऱ्या दात्याचे अवयव फुकट जातात. यामुले पालिका रुग्णालयातील अवयवदानाची संख्याही कमी आहे.

अवयव प्रत्यारोपण करण्यासाठी 2 ते अडीच लाखाचा खर्च येतो. हा खर्च अवयव प्रत्यारोपण करून घेणाऱ्याला करावा लागतो. अवयवदानाबाबत जनजागृती होत असली तरी निधीच्या तात्रिक अड़चणीमुले अवयव प्रत्यारोपण होउ शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाल्याने पालिकेनेच हा खर्च उचलावा, त्यासाठी पालिकेच्या बजेट मधे तरतूद करावी अशी मागणी आरोग्य समितीच्या बैठकीत माजी महापौर व नगरसेविका शुभा राऊळ यांनी केली. या मागणीला आरोग्य समितीने मंजुरी दिली आहे. यामुळे यापुढे अवयव दात्याचे अवयव फुकट न जाता गरजू लोकांना हे अवयव वेळेवर मिळने शक्य होणार आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages